अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक व नियुक्तीप्रदान सोहळा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दि. २२ जून रोजी कराड येथील ‘हॉटेल संगम’मध्ये पार पडणार असल्याची माहिती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, महासंघाच्या आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी (२०२५ ते २०२७) ‘उद्योजकता वर्ष’ म्हणून घोषणाही करण्यात आली आहे. या अंतर्गत, नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आणि विशेष सन्मान सोहळे घेतले जाणार आहेत.
या कार्यक्रमात कराड येथील ‘श्री रेझिग्नेशन लिमिटेड’ या कंपनीचे चेअरमन रमाकांत शेंडगे यांना उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल महासंघाच्या वतीने विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, अष्टविनायक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (राज्य मंत्री दर्जा), चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन लाटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर बैठकीला महासंघाचे पदाधिकारी श्री. चिवटे, कोकणे, बोर्से, बापट, अपटे, शर्रू मेहेंदळे, मनीष कुलकर्णी, डॉ. बर्वे देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.