spot_img
spot_img
spot_img
spot_img

कराडमध्ये शंभूतीर्थवर उभारला नव्वद फुटी भगवा ध्वज

कराड/प्रतिनिधी : –

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील शंभूतीर्थवर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर नव्वद फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाचे उद्घघाटन धारेश्वरचे मठाधिपती नीळकंठ शिवाचार्य, महालिंगेश्वर मठाधिपती विजयलिंग महाराज, बाळासाहेब महाराज, आमदार डॉ. अतुल भोसले, हिंदू एकता आंदोलनचे विक्रम पावसकर यांच्या हस्ते झाले.
शंभूतीर्थवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 12 कोटी निधीतून भव्य छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्मारकाचाच भाग असणारा नव्वद फुटी भगवा ध्वज स्मारकासमोर उभारण्यात आला आहे. शहरात प्रथमच इतक्या मोठ्या उंचीचा ध्वज उभारण्यात आला आहे. या ध्वजाने कराडच्या वैभवात भर पडली आहे.
यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडकर नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून असणारी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची मागणी महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सचिव रणजितनाना पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथे भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. भविष्यात स्मारक समितीला पूर्ण सहकार्य करणार आहे.
रणजीत पाटील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संभाजी महाराजाचा भव्य पुतळा आणण्यात आला असून येत्या दोन महिन्यात स्मारकात हा पुतळा बसविण्यात येणार आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, पालिकेतील गटनेते विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, स्मिता हुलवान, नगरसेवक आशुतोष डुबल, सुमित जाधव, शिवाजी पवार, वर्षा वास्के, किशोरी शिंदे, वैष्णवी वायदंडे, महादेव पवार, संजय शिंदे, काकासाहेब पवार, सुहास जगताप, संजय थोरात, सागर आमले, प्रतापराव इंगवले आदींसह शिवशंभूप्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या