spot_img
spot_img
spot_img
spot_img

कराडातील दिवेकर बेकरी सील

पार्सल कंपनीवरही कारवाईःअस्वच्छतेच्या तक्रारीनंतर एफ डीएची कारवाई

कराड/प्रतिनिधी:-
शहरातील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अस्वच्छतेच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या नामांकित दिवेकर बेकरीवर कारवाई करत ती सील केली आहे. याशिवाय पार्सल सेवा पुरविणार्‍या एका नामांकित कंपनीच्या कामकाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त तुषार शिंगाडे यांनी या कारवाईची माहिती दिली.
दिवेकर बेकरीमध्ये अस्वच्छता असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार उपायुक्त शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने बेकरीची तपासणी केली. या वेळी अस्वच्छतेसह अन्य त्रुटी आढळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत बेकरी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पार्सल सेवा पुरविणार्‍या एका मोठ्या कंपनीविरोधातही प्रशासनाने कारवाई केली आहे. संबंधित सेवेचे कामकाज बंद ठेवण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या कंपनीचे नाव आणि कारवाईमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आज (दि. 17) कराड नगरपालिकेच्या व्याख्यानमालेसाठी शहरात येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कारवाईमुळे व्यावसायिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करताना स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ व्यवसायांच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या