spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोयना धरण Koyana Dam १०० टक्के भरले !

१०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण; कृष्णा खोऱ्यासह सिंचन, वीज निर्मितीला मोठा दिलासा

कोयनानगर/प्रतिनिधी :

पश्चिम घाटाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे कोयना धरण koyana dam अखेर १०५.२५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के क्षमतेने भरले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने धरणाच्या पाणीसाठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, जूनअखेरपासून कोयना परिसरासह पश्चिम घाटात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत गेली आणि अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले.

गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अधूनमधून झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरणातील साठा झपाट्याने वाढत १०५.२५ टीएमसीच्या कमाल पातळीवर पोहोचला. धरण पूर्ण भरल्याने आता सातारा, सांगलीसह कृष्णा खोऱ्यातील विविध भागांसाठी पाण्याचे नियोजन अधिक सुकर होणार आहे.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर koynanagar येथे ७ मिलिमीटर, तर नवजा navaja येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर परिसरात मात्र या कालावधीत पावसाने काहीशी उघडीप दिली. या काळात धरणातील पाणीसाठ्यात ०.१९ टीएमसीने वाढ झाली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करताना धरण व्यवस्थापनास मोठा आधार मिळणार आहे.

कोयना धरणातील koyna dam मुबलक पाणीसाठ्याचा सर्वाधिक फायदा कृष्णा खोऱ्यातील सिंचन व्यवस्थेला होणार आहे. आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा satara आणि सांगली sangali जिल्ह्यांसह विविध भागांतील पाणी नियोजनासाठी धरणातील हा साठा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पासाठीही Koyna Hydroelectric Project  धरणातील पूर्ण पाणीसाठा महत्त्वाचा आहे. जलविद्युत निर्मितीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता असल्याने आगामी काळातील वीज निर्मितीचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येणार आहे. याशिवाय विविध शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठीही हा साठा आधारभूत ठरणार आहे.

दरम्यान, कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीसाठा, आवक आणि विसर्ग यावर धरण व्यवस्थापनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या