spot_img
spot_img
spot_img
spot_img

MPSC पेपरफुटीत गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीललाही अटक

नंदुरबार :

राज्यातील MPSC पेपरफुटी (MPSC) प्रकरणात प्रेमाचा अँगल असल्याचे सांगण्यात येत होते, त्याच प्रेमप्रकरणातून हा पेपर फुटल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, केवळ प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार असल्याचे पेपरफुटी प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे यांनी म्हटलंय. तसेच, तक्रार देणाऱ्या गौरव पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याचंही त्याने सांगितलं. आता, पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी (Police) तक्रारदार प्रवीण पाटील याला अटक केल्यानंतर आपला मोर्चा नंदूरबारकडे वळवला आहे. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या (FDA) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील यांना मुंबई पोलिसांच्या पथकाने नंदुरबारमधून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्यास अटक करण्यात आली आहे.

एमपीएससी अन्न व औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात प्रेमाचा अँगल समोर आलो होता. तक्रारदार गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या प्रेम प्रकरणातून हा पेपर फुटल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, प्रेमाचा अँगल केवळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दुसरा तक्रारद्रार ऋषिकेश गांगुर्डे याने केला आहे. त्यातच, पोलिसांनी याप्रकरणात गौरव पाटीलला अटक केल्यानंतर आता ऋतुजा पाटीललाही ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ऋतुजा पाटील यांना त्यांच्या ज्ञानदीप सोसायटीतील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांचे पथक आज सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. या पथकाकडून नंदुरबारातील विविध ठिकाणी झाडाझडती आणि चौकशी केल्यानंतर अखेर ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली. ऋतुजा पाटील यांना मुंबईतील विशेष गुन्हे शाखेच्या पथकाकडून नंदुरबारहून मुंबईला नेण्यात आले. ऋतुजा पाटील यांच्या अटकेमुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग येण्याची शक्यता आहे. यापूर्वी, पोलिसांनी प्रवीण पाटील यासही अटक केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अटक

अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणात मोठी कारवाई केली. मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या (MPSC) तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांनाही अटक करण्यात आली आहे.

पेपर मास लेव्हला फुटला, प्रेम प्रकरणाचा अँगल चुकीचा

पोलिसांनी चोर सोडून संन्यासाला पकडण्याचा प्रकार केला आहे. जो गौरव पाटील पेपरफुटी प्रकरणात माझ्यासोबत तक्रार द्यायला होता तो कसा काय आरोपी असू शकेल? तो आणि मी तुकाराम मुंढे यांना भेटून तक्रार दिली आणि त्यानंतर एमपीएससी आयोगात येऊन लेंडवे नावाच्या अधिकाऱ्याला भेटलो. तो पेपरफुटीचा मास्टरमाईंड आहे, असा आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे याने केला आहे. पायल किंवा तिच्या घरातल्या व्यक्तीने पेपर फोडलेला नाही, पेपर हा ज्या नकाते नावाच्या अधिकाऱ्याला अटक झाली आहे, त्याने आपल्या पुतण्यासाठी फोडला आहे. त्यानंतर ज्याने पेपर 50 लाख रुपयाना खरेदी केला त्याने पुढे आपले पैसे रिकव्हर करायला 10-10 लाख रुपयाला विकला आणि तिथून पुढे मास लेव्हला ही पेपरफुटी झाली. याप्रकरणाची व्याप्ती सातारा बीडसोलापूर जिल्ह्यात मोठी आहे, आणि हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत, असा गंभीर आरोपही ऋषिकेश गांगुर्डेनी केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या