spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍यासाठी प्रशासन सतर्कःपालकमंत्री

कराड/प्रतिनिधीः-
जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असून पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा या दोन महत्वाच्या गोष्टीसाठी सरकारने ऑगस्ट 2027 पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आचारसंहिता संपताच तातडीने बैठक घेवून पाण्याची कपात करण्याचा निर्णय घेण्यात येईल सध्या 10 टक्के तर काही ठिकाणी 20 टक्के कपात सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे नियोजन होणार नाही त्या ठिकाणी टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई हे आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवास्थानी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाबांची भेट ही जिल्हा बँकेसाठी मागासवर्गीय राखीव गटातून कराडातील रविंद्र बेडेकर यांचा उमेदवारी अर्ज होता तो मागे घेण्याची विनंती केली होती. यामुळे पॅनेल बिनविरोध होत होते. परंतू बेडेकर हे वेळेत पोहचू शकले नसल्याने त्यांचा अर्ज शिल्लक राहिला आज त्यांनी बाबांच्या उपस्थितीत दिपक चव्हाण यांना पाठिंबा देण्याचे पत्रक माझ्याकडे सुपुर्द केले.
1972 पेक्षा स्विकृत दर्षनि दुष्काळाची तिव्रता दिसत आहे. पाण्याचे बाष्पीभवन होताना आढळत आहे. बाष्पीकरणाचा विचार करता पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. कराडला कोयना धरणातीलच पाणी येते पण नदीपात्रात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास येथेही पाणी कपात होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाणी यावर सरकार गांभिर्याने काम करत असून, जिल्ह्यात या आपातकालीन परिस्थितीसाठी 5 कोटीचा निधी राखीव ठेवला आहे. आचारसंहिता संपताच जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत सर्व विभागाच्या अधिकार्‍यांंबरोबर टंचाईची बैठक आयोजित करून सूचना देण्यात येतील.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या