0.2 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

तिहेरी अपघातात एक ठार तर तीन गंभीर

तिहेरी अपघातात एक ठार तर तीन गंभीर

‌विटा / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा – पारे रस्त्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिवसागर मंगल कार्यालयासमोर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पंक्चर झाले होते. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर ट्रॅक्टर उभा केला होता. रात्री 8.45 च्या सुमारास दोन दुचाकी विट्याहून पारेकडे जात असताना ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्या. या धडकेत एकजण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहन चालकाने ट्रॅक्टरच्या पाठीमागे रिफ्लेक्टर न लावल्याने सदर घटना घडली. ट्रॅक्टरचालकाच्या हलगर्जीपणामुळे गंभीर अपघात घडला आहे.

खानापूर तालुक्यातील पारे येथील रोहन उर्फ अतिश नंदकुमार वायदंडे (२९), सुरज चंदु सावंत, अजित बाळासो माने आणि अजित बाळासो साळुंके हे पल्सर कंपनीची मोटरसायकल एम.एच. १४ / बीपी. ३८४८ व आणखीन एक मोटारसायकल (यांचा नंबर मिळू शकला नाही) असे सर्व तरुण युवक दोन्ही मोटारसायकलवरून विटा येथे जेवण करण्यासाठी रात्री पारे येथून विटा शहराकडे आले होते. तसेच जेवण करून हे सर्व जण ८.४५ वाजण्याच्या सुमारास पारे गावी परत त्यांच्या मोटारसायकलवरून जात असताना विटा – पारे रस्त्यावरील शिवसागर मंगल कार्यालयाजवळ एक पंक्चर झालेला उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर उभा होता. मात्र रस्त्यावर उभा असलेल्या, ऊसाने भरलेल्या ट्राॅलीवर कोणत्याही पद्धतीचे रिफ्लेक्टर न लावल्याने पाठिमागून पारे गावी जाण्यासाठी निघालेल्या दुचाकीने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक बसताना दुसरी दुचाकी पाठीमागून आल्याने या दोन्ही दुचाकींची जोराची धडक ट्रॅक्टर ट्रॉलीला बसली. त्यामुळे या जोरदार धडकेत दुचाकीस्वार रोहन उर्फ अतिश नंदकुमार वायदंडे (२९) रा. पारे हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती घटनास्थळावरील नागरीकांनी दिली. तर सुरज चंदू सावंत, अजित बाळासो माने, अजित बाळासो साळुंखे व अन्य एक जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे समजले.

मयत रोहन उर्फ आतिश वायदंडे या तरुणाच्या डोके, हाता – पायाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला होता. या घटनेनंतर तातडीने विटा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलीस व नागरिकांच्या मदतीने विट्यातील ओम श्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले.
सदर घटनास्थळी विटा पोलीस रात्री उशिरा पंचनामा करत होते. या घटनेनंतर पारे गावातील जखमींचे नातेवाईक व मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने ओम श्री हॉस्पिटल परिसरात घेतली. सदर रस्त्यावर उभा केलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागे जर रिफ्लेक्टर बसवले असते तर ही दुर्घटना टळली असती. मात्र ट्रॅक्टरचालकाच्या हलगर्जीपणामुळे या अपघातात रोहन उर्फ अतिश नंदकुमार वायदंडे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

अपघात घटनास्थळी अक्षरश: दोन्ही मोटरसायकलींचा चक्काचूर झाला होता. या घटनेचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या