डॉ. महेश गायकवाड; लवंडमाचीत साळुंखे महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराची प्रयोगशाळा होय. सुसंस्कारित सक्षम पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हीच पहिली संजीवनी आहे, असे मत आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणेचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत लवंडमाची यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनात करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डॉ. सतीश घाटगे होते. तर स्वागताध्यक्ष उपसरपंच उत्तम डिसले होते.
डॉ. गायकवाड म्हणाले, कोणत्याही श्रमाची लाज न बाळगता सर्वांगिण विकासाचालना मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतकडे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.
प्रो. डॉ. सतीश घाटगे म्हणाले, गेल्या सात दिवसांत मुलांना जे मिळाले, ते सोन्याहून पिवळे आहे. यातून भविष्याचा पाया तयार झाला.
सरपंच विजयराव दुर्गावळे व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या शिबिरासाठी सरपंच सौ. छाया दुर्गावळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच संदीप डिसले, राजकुमार दुर्गावळे, दिलीप डिसले, दिलीप पिसाळ, जयवंत जाधव, सचिन साळुंखे, ग्रा.पं. सदस्य सुजाता जाधव, सुजाता पिसाळ, अनुपमा कुंभार, मोनाली माळी, पोलीस पाटील संतोष सोनुलकर, युगंधर डिसले व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मिनी पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. रघुनाथ गवळी, अहवाल वाचन प्रा. अण्णासाहेब पाटील, सत्कार नियोजन प्रा. डॉ. सुभाष कांबळे, सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड व प्रा. दिपाली वाघमारे, तर प्रा. विश्वनाथ सुतार यांनी आभार मानले. शिबिराच्या नियोजनासाठी प्रा. विनायक जाधव, प्रा. जयदीप चव्हाण, प्रा. प्रवीण देशमुख, प्रा अरविंद मोहिते यांनी सहकार्य केले.