कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरातील बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांचा पहिला हप्ता स्विकारताना सहाय्यक नगररचनाकारासह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारेंसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये श्री. खंदारे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी पतंगे यांनी आज फेटाळल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी दिली.
याबाबत सरकारी वकील अॅड. परमाज यांना दिलेली माहिती अशी की, कराड शहरातील बांधकाम व्यावसायीक तक्रारदाराचे पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. त्यांनी बांधकाम परवानगीसाठी २०१७ मध्ये कराड नगरपालिकेत अर्ज केला होता. नियमावलीतील बदलाप्रमाणे सुधारित बांधकाम परवानगीसाठी २०२३ मध्ये पुन्हा अर्ज केला. यादरम्यान सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांनी खासगी इसम अजिंक्य देव याच्या समवेत तक्रारदाराला दोन हजार स्क्वेअर फूट वाढीव एफएसआय असल्याचे सांगून बाजारभावाप्रमाणे मिळकतीच्या ८० लाखांपैकी दहा ते बारा टक्के म्हणजेच १० लाख रुपयांच्या रकमेची मागणी पंचासमक्ष केली होती. बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, पालिका कर्मचारी तोफिक शेख आणि खाजगी इसम अजिंक्य देव यांनी संगनमताने तक्रारदाराकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाखांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हंटले होते.
त्याची तक्रार तक्रारदाराने दाखल करताच सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पाच लाखांचा पहिला हप्ता घेताना पालिका कर्मचारी तोफिक शेख याला रंगेहात पकडले. नुकतीच बदली झालेले कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, तोफिक शेख व खाजगी इसम अजिंक्य देव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खंदारेनी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पतंगे यांच्या न्यायलयात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर अतिरिक्त सरकारी वकील अॅड. परमाज यांनी त्यावर युक्तीवाद केला. त्यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशस पतंगे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी शंकर