15.4 C
New York
Saturday, May 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाबळेश्वर पालिका प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

‘प्रवासी व प्रदूषण कर वसुली नाक्यांचा झाला भंगार वाडा’

महाबळेश्वर/संजय चोरगेः-
महाराष्ट्रातील ’क’ वर्ग नगरपालिका प्रवर्गातील सर्वात श्रीमंत असलेल्या महाबळेश्वर नगरपालिके अंतर्गत येणार्‍या प्रवासी व प्रदूषण कर वसुली नाक्यांना सध्या प्रशासकीय राजवटी मध्ये बकालीकरणाचे ग्रहण लागले आहे.
त्यामुळे महाबळेश्वरचा नावलौकिक वाढण्याऐवजी तो खालावण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रतिवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा करणार्‍या महाबळेश्वरचे इंट्री पॉइट वरील नाक्यांचा अक्षरशः झालेला भंगार वाडा, त्या ठिकाणी केवळ देखावा म्हणून उभी असलेली सुरक्षा यंत्रणा व नाक्या ठिकाणी महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटकांकरिता साधे शौचालय देखील नसल्याने विशेषतः महिला पर्यटकांच्या तोंडून उमटणारे नाराजीचे स्वर महाबळेश्वरची प्रतिमा मलीन करीत आहेत. त्यामुळे स्थानिक रोजगारावर देखील याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु थंड हवेच्या ठिकाणी देखील वातानुकूलित दालनात बसून महाबळेश्वरचा कारभार चालविणार्‍या प्रशासकांना मात्र या गोष्टींचे अजिबात सोयर सुतक नाही याचे मात्र आश्चर्यच..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या