spot_img
spot_img
spot_img
spot_img

वॉचमन शेडच्या नावाखाली खेळाच्या मैदानावर अनधिकृत बांधकाम

सातारा

शहरातील 273 बुधवार पेठ येथील आरक्षित असलेल्या खेळाच्या मैदानावर वॉचमन शेडच्या नावाखाली सुरू असलेले बांधकाम हे अनधिकृत पणे सुरू असून प्रवीण पाटील हे स्वतःच्या कार्यालय थाटण्यासाठी हे पक्के बांधकाम करत असल्याचा आरोप उद्योजक युसुफ कच्छी

यांनी पत्रकार परिषदेत केला आहे

 

कच्छी यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जागा लहान मुलांच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे मात्र या जागेवर प्रवीण पाटील यांच्याकडून बांधकाम करण्यात येत आहे ही जागा हॉस्पिटल साठी खरेदी केल्याचा दावा ते करत असून आरक्षणाची मला कोणतीही माहिती नसल्याचे प्रवीण पाटील धांदात खोटे बोलत आहेत

दरम्यान या जागेचा व्यवहार मी तेरा वर्षांपूर्वी केला होता हीच जागा पुन्हा प्रवीण पाटील यांनी 90 लाखाला

घेतल्याचे ते म्हणतात मुळात सध्याच्या दरानुसार या जागेची किंमत पाच कोटीच्या घरात आहे मात्र त्यांना एवढ्या कमी किमतीत ही जागा कशी उपलब्ध झाली हा एक प्रश्न असल्याचे कच्छी म्हणाले आहेत

आरक्षित जागेवर सुरू असणारे बांधकाम थांबवण्याचे नगरपालिकेने 31 जुलै रोजी आदेश काढून कळविले होते तरीही प्रवीण पाटील म्हणतात माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही मात्र या जागे संदर्भात आजपर्यंत पाच तक्रारी अर्ज दाखल आहेत . पत्रकार परिषद

घेऊन माझ्यावर जे आरोप करून माझी जी बदनामी केली आहे त्या बाबत मी पाटील यांचे विरोधात मानहानी दावा दाखल करणार असल्याचे उद्योजक युसुफ कच्छी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या