27.3 C
New York
Saturday, July 20, 2024

Buy now

spot_img
spot_img

राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची वांद्रयात बैठक

मुंबई-
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. या निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची वांद्रयातील एमआयजी क्लबमध्ये आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पदाधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाचे सरचिटणीस हजेरी लावणार आहेत.
मागील बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर २०० ते २२५ जागा लढविणार असल्याची घोषित केली होती. पदाधिकार्‍यांनो या निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदारसंघांचा आढावा देण्यासाठी  लवकरच निरिक्षकांच्या नेमणुका करण्यात येतील, असेही राज ठाकरेंनी बैठकीत सांगितले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी उद्या मनसेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे पदाधिकार्‍यांना कोणते आदेश देणार यावर सार्‍याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या