13.4 C
New York
Tuesday, March 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन 

उंब्रज/प्रतिनिधी

तासवडे ता.कराड येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहन धारकांकडून अन्यायकारक जबरदस्तीच्या जोरावर सुरू असलेल्या टोलवसुली विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवार दि.७ रोजी सकाळी ११वाजनेच्या सुमारास चारचाकी प्रवाशी,मालवाहतूक व खाजगी वाहनांसह टोल नाक्याची सातारा ते कराड जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले व टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले यावेळी टोल आजपर्यंत दिला नाही,पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले यावेळी कराड डीवायएसपी अमोल ठाकूर हे उपस्थित होते तर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅग मधून वाहनाने टोल परिससरात ये जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना मेसेज आल्याने स्थानिकांच्यात नाहक भुर्दंड बसू लागल्याने रोष निर्माण होऊ लागला होता याबाबत ३० जून रोजी शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी लेखी निवेदन समक्ष भेटून दिले होते तरीही टोल प्रशासनाने आपली आडमुठी भूमिका न सोडता स्थानिकांची टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनांसह मोर्चा काढून टोल प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय शनिवार दि.६ रोजी मार्केट कमिटीच्या हॉल मध्ये उंब्रज परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत घेतला होता यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले.

 

तासकडे टोल परिसरात आंदोलकांनी आंदोलनाला सुरुवात केल्यावर टोल मॅनेजर थोरात यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव,मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव ,उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव,शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना टोल व्यवस्थापक थोरात यांच्याकडे व्यक्त केल्या यावेळी थोरात यांनी याबाबतची सर्व माहिती कोल्हापूर एनएचआय कार्यालयात दिली जाईल शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली।जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबली असल्याने स्थानिकांचा टोल।कापला जात असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी योग्य तो समन्वय काढून या अडचणीतून मार्ग काढणार असल्याची माहिती दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या