27.3 C
New York
Saturday, July 20, 2024

Buy now

spot_img
spot_img

संतश्रेष्ठ संत सोपान काका महाराज पालखी दर्शनासाठी माळेगाव मध्ये उसळला जनसागर

नगरपंचायत प्रशासन,आरोग्य विभाग प्रशासन,  पोलीस प्रशासन यांचे कडून चोख व्यवस्था
बारामती प्रतिनिधी,
         सोमवार दि-०८, रोजी माळेगाव नगरपंचायत हद्दीमध्ये भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचे आगमन दुपारी ३ वाजता झाले यावेळी माळेगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी बालाजी लोंढे तसेच ग्रामस्थांनी माळेगाव  नगरपंचायत शिवेवर पालखी प्रमुख ॲड. त्रिगुण गोसावी महाराज यांचा हार व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच यानंतर पालखी निरा बारामती रस्त्या मार्गे येऊन गोल रिंगण मैदानामध्ये दाखल झाली
            यावेळी संतश्रेष्ठ सोपान काका महाराज पालखीचे दुसरे रिंगण माळेगाव येथे पार पडले दरम्यान या गोल रिंगणाणे माळेगाव नगरीतील जनसमुदायाच्या डोळ्याचे पारणे फेडले या गोल रिंगणावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे, उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्र, तहसीलदार बारामती गणेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी कोमल शिंदे, महावितरण अभियंता रोहित राख, पोलीस निरीक्षक नितीन नाम, तलाठी अमोल मारग, ग्राहक संरक्षण परिषद पुणे जिल्हा प्रमोद जाधव, माजी सरपंच दीपक तावरे, अमित तावरे, प्रदीप जाधव,अशोक सस्ते, इत्यादी मान्यवर गोल रिंगण सोहळया वेळी उपस्थित होते
          दरम्यान यानंतर संतश्रेष्ठ सोपान काका महाराज पालखीचे प्रस्थान माळेगाव मधील मुक्काम असणाऱ्या ठिकाणी हनुमान मंदिराकडे करण्यात आले यावेळी माळेगाव मधील मुख्य चौकामध्ये पालखीवर पुष्पवृष्टी करून पालखीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा प्रवेशद्वारातून पालखीचे माळेगाव नगरीमध्ये टाळ मृदुंग यांच्या गजरामध्ये आगमन झाले यावेळी उपस्थित जनसमुदायची मने टाळ मृदांच्या तालाने वेधून घतली
            यानंतर पालखी माळेगाव येथील हनुमान मंदिरामध्ये आरतीसाठी तसेच भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली यावेळी संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांच्या पालखीची आरती करण्यात आली माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन नम यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे यांनी तैनात केलेल्या चोख पोलीस बंदोबस्तामुळे नागरिकांना भक्तीमय वातावरणामध्ये संतश्रेष्ठ संत सोपान काका महाराज पालखीचे दर्शन घेता आले
            त्याचबरोबर माळेगाव येथील एस.पी. सराफ प्रायव्हेट लिमिटेड, शरद पतसंस्था, माळेगाव सहकारी साखर कारखाना, महावितरण माळेगाव शाखा तसेच माळेगाव मधील विविध मंडळांनी, संस्थांनी, नागरिकांनी  वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण इत्यादीची सोय केली होती

Related Articles

ताज्या बातम्या