-0.3 C
New York
Sunday, December 1, 2024

Buy now

spot_img
spot_img

साताऱ्याच्या दौऱ्यामध्ये अजितदादांची विधानसभेची राजकीय पेरणी 

जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश 
सातारा/प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये विधानसभेची पेरणी सुरू केली आहे .येथील पोवई नाक्यावरील राष्ट्रवादी कार्यालयांमध्ये अजित दादांनी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व कार्याध्यक्ष अमित कदम तसेच निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि मतदारसंघाच्या सर्वेक्षणानंतर इलेक्टिव्ह मेरिट च्या उमेदवारांचा शोध हा अजित दादांनी रडारवर घेतला आहे
याशिवाय राष्ट्रवादीच्या विस्तारित कामा संदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अजित दादा पवार हे गुरुवारी रात्री मुक्कामी साताऱ्यात होते . कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या घरी स्नेहभोजन घेतल्यानंतर दादा शासकीय विश्रामगृहांमध्ये रवाना झाले. अजित दादा यांच्याकडे अमित कदम मित्र समूहाच्या वतीने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती . शुक्रवारी सकाळी येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या दालनामध्ये अजित दादांनी जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला जिल्हाध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, कार्याध्यक्ष अमित कदम  चिटणीस श्रीनिवास शिंदे, वैद्यकीय सहाय्यता कक्ष राज्य उपाध्यक्ष सागर भोगावकर इत्यादी यावेळी उपस्थित होते .
अजित दादा पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत . शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे बैठक घेऊन वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्याची रणनीती निश्चित केली आहे .या संदर्भाने अजित दादांनी सुद्धा साताऱ्यात तळ देऊन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे .बारामती येथे झालेल्या जन्मसन्मान मेळाव्यामध्ये दादांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे त्याचा पहिला टप्पा पिंपरी चिंचवड येथे शनिवारी होणाऱ्या पहिल्या मेळाव्यातून होणार आहे .त्यानंतर पुढील महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातही असाच मेळावा घेऊन प्रत्यक्ष तयारीचे संकेत दिले जातील असा अंदाज आहे .अजित दादांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी करा व पक्ष रचना मजबूत करा असे स्पष्ट केले तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणी मजबूत करून हाय मेरिट चे उमेदवार शोधणे हा पुढील अजेंडा असणार आहे . अजित दादा पवार या संदर्भात म्हणाले महायुतीच्या बैठकीमध्ये 288 मतदार संघाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राजकीय ताकतीचा अंदाज घेऊन त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये विधानसभेचे उमेदवार निश्चित केले जातील . त्या दृष्टीने सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबूत असेल तर जास्त जागांवर मागणी करणे शक्य होणार आहे त्यासाठीच सदस्य नोंदणी पासून ते जिल्ह्यातील बूथ रचनेपर्यंत कार्यकर्त्यांची साखळी उभी राहिली पाहिजे असे दादांनी निर्देश दिल्याचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी सांगितले .
राष्ट्रवादी कार्यालयाचा होणार विस्तार
पोवई नाक्यावरील राष्ट्रवादी कार्यालयाचा विस्तार करण्याचे निर्देश अजितदादा पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले . कार्यालयासमोर मोठा उतार असल्याने ती जागा उचलून तिथे पायऱ्यांचे टप्पे करणे, नागरिकांना वेटिंग रूम, प्रसाधनगृह, पार्किंगची व्यवस्था इं सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले . बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नितीन खैरमोडे यांच्याशी अजितदादांनी संपर्क साधून कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या