-0.3 C
New York
Sunday, December 1, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोयना धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू होणार 

धरणात 72 टक्के पाणीसाठा वक्र दरवाजे उघडणार
पाटण/प्रतिनिधी
आज दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून दहा हजार वीस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार* असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.
धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल.
*कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.*
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या