7.7 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य प्रमोद जाधव यांच्याविरुद्ध माळेगाव येथे खंडणीचा व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

बारामती प्रतिनिधी, 

    माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये ओळख असणारे व या कार्यातून पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्य पदी सलग चौथ्यांदा नियुक्त झालेले प्रमोद जाधव यांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये खंडणीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .

  दरम्यान या प्रकरणी अभिजीत संपतराव शिंदे वय 30 रा. दंडवाडी, सुपे, ता. बारामती यांनी प्रमोद मानसिंग जाधव यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सदरच्या फिर्यादीमध्ये शिंदे यांनी नमूद केले आहे की, माळेगाव येथील ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य प्रमोद जाधव यांनी माझ्या अल्पवयीन भाचास वय वर्षे १० यास माळेगाव येथील मधुरा रेसिडेन्सी येथील त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून तुझा पिक्चर मध्ये व्हिडिओ पाठवायचा आहे मी बोलतो सांगतो अशा पद्धतीने तू त्या वर बोल असे सांगून माझ्या अल्पवयीन भाच्याचा माझ्या विरोधात व्हिडिओ चित्रीकरण केले.

  तसेच केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे प्रमोद जाधव यांनी मला वेळोवेळी दि 3 मे ते 31 जुलै पर्यंत सदरील व्हिडिओच्या आधारे खंडणी उकळण्याच्या उद्देशाने भेटीगाठी घेऊन त्यास व्हिडिओ तसेच अर्ज दाखवत धमकी दिली तसेच माझ्याकडे चार लाख रुपये खंडणीसाठी तगादा लावला. असे फिर्यादीमध्ये नमूद केले.

   दरम्यान अभिजीत शिंदे यांनी अल्पवयीन भाचा याच्याशी अशाप्रकारे अनैसर्गिक बाल लैंगिक शोषण असे कोणतेही कृत्य केले नसल्याने त्यांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत प्रमोद जाधव यांच्याकडून होत असलेल्या खंडणी मागणीचा प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगितला यावर राठोड यांनी जाधव यांचे विरोधात पुरावे जमवण्यास शिंदे यांना सुचवले

   यावर उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये दि. 31 रोजी संध्याकाळच्या सुमारास माळेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या समवेत सापळा रचून प्रमोद जाधव यांना त्यांच्याच कार्यालयामध्ये रंगेहात 25 हजारांची खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच जाधव यांच्याविरुद्ध खंडणी मागणे त्याचबरोबर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत अधिक तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर करत आहेत.

    प्रमोद जाधव यांच्या कार्यालयामध्ये तपासणी केली असता त्याच्याकडे बरेच अर्ज मिळून आले आहेत त्याचबरोबर त्याच्या मोबाईल मध्ये देखील अशा पद्धतीने केलेले बरेच व्हिडिओ समोर आले आहेत अशा व्हिडिओंच्या आधारे त्यांनी बऱ्याच जणांना खंडणी मागितल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याविषयी देखील पोलीस तपास करीत आहे

         त्याचबरोबर प्रमोद जाधव यांच्या विरोधात जर कोणाची तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ माळेगाव तसेच बारामती पोलिसांशी संपर्क साधावा. त्याचबरोबर कोणाचे नाव गुप्त ठेवायचे असल्यास ते देखील ठेवण्यात येईल

                  डॉ. सुदर्शन राठोड

उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या