20.5 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

spot_img
spot_img

मोदी, गडकरींच्या खिशातील पैसा नाही

 

खड्डेयुक्त महामार्ग असताना दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे जनतेचा पैसा आहे मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आ पपृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलना दरम्यान प्रशासनाला विचारला अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे म्हणून ठेका दिला आहे गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पंधरा वीस टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने काँट्रॅक्ट देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे महामार्गाचे सब कॉन्ट्रॅक्ट डीपी जैन यांना दिले असून गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे

 

तासवडे ता कराड येथील टोलनाक्यावर सकाळी 10 वाजता सुरू झालेले आंदोलन शांततेत सुरू असून सर्वच वाहने टोल न घेता सोडली जात आहेत प्रशासनाने ठोस भूमिका जाहीर केल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नसल्याचे प्रतिपादन आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असून कोल्हापूर येथील महामार्ग प्राधिकरण यांच्याबरोबर आ सतेज पाटील यांची चर्चा सुरू आहे सर्व रस्ता सुरळीत झाल्याशिवाय टोल वसुली करू नये ही प्रमुख मागणी असल्याची माहिती आ चव्हाण यांनी दिली यावेळी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री आ.विश्वजित कदम व सांगली सातारा जिल्ह्यातील काँगेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या