गणेश पेठ येथील घटणा.
विटा प्रतिनिधी-
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ( गणेश पेठ) येथे एक बिल्डिंगच्या पायरीवर दुपार पासून एक अनोळखी तरुण बसला होता तो बराचा वेळ तिथच होता अशी घटणास्थाळी नागरीतून माहिती मिळाली परंतु ज्या पायरी वरती तो बसला होता. त्याच पायरीवरती हा तरुण मुंडके खाली घालून तसाच बसून होता. मात्र येण्या जाणारे नागरिक फक्त पहात होते. मात्र तेथील काही नागरिकांनी या तरुणाची काहीच हालचाल दिसून येईना. त्यामुळे सदर नागरिकांनी दूरध्वनीवरून विटा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. यावेळी विटा पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर त्या तरुण युवकास. हात लावून पाहिले मात्र त्याचा त्या पायरीवरतीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना सायंकाळी ५/३० च्या दरम्यान घडली . सदर विटा पोलिसांनी आजूबाजूला या व्यक्तीचा फोटो काढून त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागांमध्ये विटा पोलीस जाऊन सुद्धा आले परंतु कोणीच या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगत होते. शेवटी मोबाईलवर काही ग्रुप वर हा फोटो सोडण्यात आला यावेळी सदर या व्यक्तीची ओळख पटली. यावेळी हा व्यक्ती मूळचा (कर्नाटक) विजापूर येथील मुकेश बसाप्पा पारसट्टे ( वय वर्ष ३५ सध्या राहणार येवलेवाडी).असे नाव असल्याचे समजले हा तरुण व्यक्ती कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी येथे याचे कुटुंब असल्याचे समजले. त्यानंतर विटा पोलिसांनी येवलेवाडी येथे मुकेश यांचे मेहुणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना विटा येथे तातडीने येण्यास सांगितले यावेळी सदर मेहुणे यांनी त्या व्यक्तीचा फोटो बघितल्यानंतर आमचाच नातेवाईक असल्याचे त्यांनी सांगितले. विटा पोलिसांनी सदर तातडीने या तरुणाच्या नातेवाईकाचा शोध घेऊन हा मृतदेह विटा शहरातील सांगली रोड ग्रामीण रुग्णालयात पीएम साठी हलवण्यात आला. या घटनास्थळी संबंधित पोलीस अधिकारी यांनीही यासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली. सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून याचा मृत्यू कसा झाला हे मात्र समजू शकले नाही रात्री उशिरा सदर या घटनेचा विटा पोलीस पंचनामा करत होते.