42 हजार 100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात
पाटण/प्रतिनिधीः-
कोयना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग कमी करण्यात आला असून 42 हजार 100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे 8 फु टांवर करण्यात आले आहेत.
जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. गेली काही दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतही चांगला पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिम भागात धुवॉधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोर्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला आहे.