समीर शेख यांची मुंबई शहरला बदली
अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची राज्य राखीव पोलीस बल पुणे येथे बदली
सातारा/प्रतिनिधी
साताऱ्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहर पोलीस उप आयुक्तपदी बदली झाली आहे त्यांच्या जागी ठाणे जिल्ह्याचे परिमंडळ क्रमांक चार चे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे सातारा जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक आचल दलाल यांची साताऱ्यातून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथे बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वैशाली कडू कर यांची साताऱ्यात बदली करण्यात आली आहे राज्य शासनाच्या गृह मंत्रालय विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनीही आदेश निर्गमित केले पोलीस अधीक्षक समीर शेख यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट सेवा मेडल जाहीर झाले होते त्याच दरम्यान त्यांच्या बदलीची ही वृत्त सायंकाळी येऊन धडकले त्यांची बदली मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे ऑक्टोबर 2023 मध्ये ते साताऱ्यात बदलून आले होते संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी विक्रमी तडीपाडीचे प्रस्ताव करत कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला सातारा लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्व कोणाची विशेष चुणक दिसून आली साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी डॉक्टर सुधाकर पठारे यांची वर्णी लागली आहे ते ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ क्रमांक चार येथून बदली होऊन आले आहेत ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या 17 महिन्याच्या कालावधी त्यांनी आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पठारे यांचे कार्य वादातीत ठरले आहे या बदल्यांचे आदेश मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची बदली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथे करण्यात आली आहे त्यांच्या जागी सोलापूर प्रशिक्षण केंद्राच्या वैशाली कडूकर या साताऱ्यात त अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी बदलून आले आहेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक या दोघांचीही बदली करण्यात आली आहे आचल दलाल या जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या पत्नी त्यांची अवघ्या सहा महिन्यांमध्येच बदली करण्यात आली