18.9 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

spot_img
spot_img

पोलीस अधीक्षक समीर शेख यांना विशेष सेवा पदक

नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घातल्याबद्दल सन्मान 
सातारा / प्रतिनिधी
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह एकूण सात जणांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे .नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे पदक जाहीर झाले आहे विषय सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, फौजदार परितोष दातीर, तेजस्विनी देशमुख, सचिन भिलारी, अविनाश गवळी, मच्छिंद्रनाथ पाटील, प्रिया पाटील अशी सातारा जिल्ह्यात सध्या कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत
 एस पी समीर शेख यांची नोव्हेंबर 2023 मध्ये सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती 2021 ते 23 या कालावधीत ते गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते . समीर शेख हे गडचिरोली येथे असताना त्यांनी पोलीस प्रशासनाची धुरा सांभाळली याशिवाय अनेक मोहिमांमध्ये सक्रिय भाग घेऊन त्या मोहिमा यशस्वी केल्या .त्यानंतर दोन वर्षे तेथे सेवा बजावल्यावर साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून ते रुजू झाले
 गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून तेथील नागरिकांना वेगवेगळ्या योजना मिळण्यासाठी ही योजना समीर शेख यांनी सुरू केली  समीर शेख यांनीही अभिनव योजना सुरू करून दोन वर्षात अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले .यामुळे शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली त्यामुळेच त्यांना हे पदक जाहीर झाले आहे

Related Articles

ताज्या बातम्या