16.4 C
New York
Wednesday, October 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

कराड उत्तरेत बॅनर वॉर रंगले

प्रश्नांना पुराव्यासहित उत्तरे चर्चेत,’बाई काय हा प्रकार’

उंब्रज /अनिल कदम

कोणत्याही परिस्थितीत कराड उत्तरेत बदल घडवण्यासाठी महायुती कामाला लागली आहे. शांत संयमी आ.बाळासाहेब पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शनिवारी सोशल मीडियावर बॅनर वॉर सुरू झाले आहे.’बाई काय हा प्रकार’अशी टॅग लाईन वापरत विद्यमान आमदारांनी केलेल्या विकासकामांची खिल्ली उडवली जात असून ‘आ. बाळासाहेब पाटील यांनी केलेला पाठपुरावा’अशी पुराव्यासहित पोस्ट व्हायरल करीत आमदार गटाने प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केल्याने बॅनर वॉर आता प्रश्नाला प्रतिउत्तर चक्रात परिवर्तीत होऊ लागले आहे.नडशी आणि किवळ या दोन गावातील विकासकामे सध्या चर्चेत आली असून याला सायंकाळी महायुतीच्या माजगाव येथील पोस्टने धार लावली जात आहे.विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत कराड उत्तरेत अजून काय धुमाकूळ घातला जाणार याचीच चर्चा सामान्य मतदारांच्यात होऊ लागली आहे.

 

कराड उत्तरचे विद्यमान आमदार व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची जनमानसातील छबी एक विकासात्मक वाटचाल करणारे नेतृत्व अशीच राहिली आहे.कोणत्याही वादात न अडकणारे व्यक्तीमत्व म्हणून गेल्या तीस वर्षांपासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.सहसा कोणत्याही टीकेला उत्तर देण्याची भूमिका ते घेत नसले तरी शनिवारी झालेल्या व्हायरल पोस्ट नंतर तात्काळ खुलासा करीत जिल्हा नियोजन मधील पत्र व्हायरल केल्याने कुठेतरी त्यांनाही ही बाब खटकली असल्याची चर्चा मतदारांच्यात सुरू झाली आहे.

 

कोणत्याही परिस्थितीत मी लढणार अशी भूमिका घेऊन मनोज घोरपडे यांनी शड्डू ठोकला आहे.तर पक्ष सांगेल ती भूमिका पार पाडणार अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी घेतली आहे.(तरीही उमेदवारी मिळावी यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत,सूत्रांची माहिती)रामकृष्ण वेताळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याने महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे तिघेही इच्छुक आपापल्या परीने मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असून सर्वात आक्रमक आणि माघार घेण्याच्या भूमिकेत नसणारे मनोज घोरपडे यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलावर्ग तसेच वयस्कर नागरिकांना आपलेसे करण्यावर सर्व लक्ष केंद्रित केल्याने ‘एकच वादा मनोज दादा’असे घोषवाक्य सध्या जोर धरू लागले आहे.

 

मसूर परिसरातील कुलदीप क्षीरसागर यांनीही कराड उत्तरेत चाचपणी सुरू केली असून खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे क्षीरसागर विविध कार्यक्रम आयोजित करून कराड उत्तर आमदारकीच्या शर्यतीत असल्याचे मतदारांच्या नजरेच्या टप्प्यात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.यामुळे किती उमेदवार उत्तरेतून नशीब आजमवणार आणि मतविभागणीचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला यावरच निर्णायक गणिते अवलंबून असणार आहेत.

 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षात असणारी राजकीय परिस्थिती यावेळी बदलली आहे.दोन राष्ट्रवादी,दोन शिवसेना,भाजपमध्ये तिघेजण इच्छुक चार तालुक्यातील मतदार,कराड दक्षिण वगळता सभोवताली महायुतीचे आमदार,जिल्हा बँक व बाजारसमिती निवडणूक,आ.बाळासाहेब पाटील व अतुल भोसले यांचे सख्य,बाजारसमितीत उदयसिंह पाटील,मनोज घोरपडे यांचे एकत्रित पॅनल,अशा अनेक बाबी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहेत.यामुळे हवेत राहण्याचे दिवस संपले असून वास्तव काय आहे याची चाचपणी उमेदवारांना करावी लागणार आहे जनता सुज्ञ असून सोशल मीडिया एक भंपकपणा असल्याची चर्चा नागरिकांच्यात घडू लागली आहे.मनोरंजन म्हणून ठीक आहे परंतु खरंच विद्यमान आमदारांनी काहीच कामे केली नसतील तर जनतेच्या दरबारात कागदी पुरावे कामाला येणार आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या