7.3 C
New York
Friday, October 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

माझी वसुंधरा’ अभियानात महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचा डंका

महाबळेश्वर-
पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषेदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी केलेली कामे, त्यात ठेवलेले सातत्य याच्या जोरावर महाबळेश्वर नगरपरिषदेला हे यश प्राप्त केले आहे.
  राज्य शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान हे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये निसर्गाच्या पंचतत्त्वावर आधारित उपक्रम आहेत. या वर्षीचा अभियानाचा चौथा टप्पा होता. महाबळेश्वर नगरपरिषद पहिल्या टप्यापासून यात सहभागी असून, यावर्षी प्रथमच पालिकेने राज्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. या स्पर्धे अंतर्गत शहरातील कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन होत असते. दरम्यान, पालिकेला या बहुमनाबद्दल एक कोटी 75 लाख रुपयांचा हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराच्या रकमेतून पर्यावरण संवर्धनाची कामे केली जाणार आहेत.
माझी वसुंधरा ४.० या उपक्रमातर्गत महाबळेश्वर शहरातील पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे लोकप्रिय प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री योगेश पाटील यांनी
कर्मचाऱ्यांच्या साथीने नाविन्यपूर्ण संकल्पनेतून शहरात विविध उपक्रम राबवून शहराचा कायापालट करण्याचे काम यशस्वीरित्या केले आहे. यामध्ये महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेण्णा तलावातील १९९२ नंतर प्रथमच गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून या माध्यमातून वेण्णा तलावाचा जलसाठा वाढून महाबळेश्वर व पाचगणी शहराचा आगामी पाणी प्रश्न मिटला आहे. शहरात नवीन हरितपट्टे विकसित करणे, शहरातील विविध ठिकाणी देशी प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण, रोपवाटिकांची निर्मिती, महाबळेश्वर शहरातील लोकजेवविविधतेची नोंद करून अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे वृक्षगणना करून महाबळेश्वर शहरातील हरित अछादानाची टक्केवारी वाढवण्याचा उल्लेखनीय कामगिरी या काळात झाली.
शहरातील नागरिकांना पर्यावरणपुरक सण व उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहित करणे, पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेण्णा तलाव येथे आकर्षक नवीन बोटींची व्यवस्था करणे, शहरातील पर्यटन स्थळांवर टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतून सेल्फी पॉइंट निर्मान करणे, नुतनीकरणयोग्य उर्जा स्रोतांचा वापर करून ई-वाहन चार्जिंग स्टेशन निर्माण करणे, शहरातील सार्वजनिक भिंतींवर आकर्षक, सुबक व माहितीपर चित्रांच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृ‌ती करणे, सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा पंचतत्वं दर्शविणाऱ्या कलात्मक प्रतीकृती उभारण्यात आलेल्या आहेत. या विविध उपक्रमातून स्वच्छ व सुंदर महाबळेश्वरची ओळख टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने मिळवलेल्या या यशाबद्दल महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री, योगेश पाटील, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे….
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या