-1.5 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

मलकापूरचे विकासदूत… मनोहर भास्करराव शिंदे (भाऊ)

मलकापूर म्हणजे नाविण्यपूर्ण योजना व संकल्पना साकारणारे सर्व सोयींयुक्त शहर. गेल्या 15 वर्षांपासून अखंडपणे 24 तास पाणीपुरवठा करणारे शहर, आदर्श सोलरसिटी, स्वच्छ व सुंदर शहर, विकासाची प्रयोगशाळा, किंबहुना विकासाचे माहेरघर म्हणजे मलकापूर. हे सार झालं फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबांच्या संकल्पनेतून आणि व कै. भास्कररावजी शिंदे (दादा) यांच्या प्रेरणेतून. मलकापूर शहराच्या विकासामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेच नव्हे, तर संपूर्ण चव्हाण कुटुंबाचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे (भाऊ) आज यशस्वी वाटचाल करत असून ते खऱ्या अर्थाने मलकापूर शहराचे विकासदूत आहेत.
– सुरेश जाधव (गो-का-क- मलकापूर)
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विकासात्मक दृष्टीकोन असणाऱ्या बाबांनी मलकापूरला नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. मलकापूर शहराला रोलमॉडेल बनविण्याचे स्वप्न केवळ बाबांमुळे साकार झाले. सन 2013 मध्ये झालेली (17-0) पंचवार्षिक निवडणूक म्हणजे जनतेने बाबांवर व भाऊंवर दाखवलेल्या विश्वासाची दिलेली पोहोचपावती. सन 2008 साली ग्रामपंचायत बरखास्त करुन 24×7 नळपाणी पुरवठा योजनेच्या उभारणीला सुरुवात केली.  यामध्ये खुप अडचणी आल्या. बाबांनी कै. भास्कररावजी शिंदे यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व जबाबदारी मनोहर भाऊंवर टाकली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मनोहर भाऊंना त्यांच्या आशिर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहिल.
आज मलकापूरची ओळख जगाच्या नकाशावर वेगळ्या प्रकारे झाली आहे. मलकापूर शहराची सध्या व भविष्यात होणाऱ्या वाढीचा विचार करून, 24×7 नळपाणी पुरवठा योजना सन 2001 मध्ये सुरु केली. या योजनेमुळे पाणी व वीज बचत होऊन नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. यशाची देशपातळीवर दखल घेत अशा प्रकारच्या नाविण्यपूर्ण योजनेचा अनेक गावांनी व शहरांनी स्विकार केला आहे.
या योजनेच्या अनुभवावरूनच केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मीटरद्वारे पाणी पुरवठ्याची संकल्पना समाविष्ट झाली. पंधरा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करण्याचा धाडशी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील मलकापूर ही चौथी नगरपंचायत स्थापन केली. या नगरपंचायतीच्या स्थापनेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), त्याचबरोबर स्व. विलासरावजी देशमुख यांचे मोठे पाठबळ लाभले. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर दादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. तसेच ग्रामपंचायतीकडे कार्यरत सर्व गरीब, सामान्य कुटुंबातील कर्मचाऱ्यांचा समावेश नगरपंचायतीच्या आकृतिबंधामध्ये आग्रहाने विशेषबाब म्हणून करून घेतला.
‘श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान’ या आदर्श योजनेंतर्गत मुलींना मोफत पास व स्वतंत्र बस असल्यामुळे दरवर्षी शहरातील अंदाजे 500 मुली लाभ घेत आहेत. नगरपरिषद व कराड अर्बन बँक यांच्या सयुक्त विद्यमाने शहरात जन्मलेल्या प्रत्येक मुलीस वयाच्या एकविसाव्या वर्षी रुपये 1 लाख रुपये मिळण्याची सोय केली. शहरातील आतापर्यंत अंदाजे 400 मुलींना 4 कोटी रुपये रकमेचा लाभ मिळाला आहे. शहरात सोलर सिटी योजना प्रकल्प सुरू केला. लाभार्थीना घरपट्टीमधे 10 टक्के सूट देऊन नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. यासाठी मलकापूर नगरपरिषदेला महाऊर्जा विकास अभिकरण महामंडळाचा ऊर्जा बचतीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मलकापूर नगररिषदेने आज देशातील पहिला ‘रोटरी मकॅनिकल पध्दतीचा घनकचरा प्रकल्प’ यशस्वीपणे सुरू केला आहे. या प्रकल्पातून तयार झालेल्या खताला शासनाकडून ‘मलकापूर हरित महासीटी कंपोस्ट’ ब्रँड असे नावही मिळाले आहे. सन 2013 मध्ये मलकापूर शहरासाठी 42 कोटींची भुयारी गटार योजना मंजूर झाली. कराड शहरानंतर सातारा जिल्ह्यात भुयारी गटर योजना राबवणारे मलकापूर हे दुसरे शहर व राज्यातील पहिली नगरपरिषद आहे.
नगरपरिषदेस एक हेक्टर चौदा गुंठे जागा प्रशासकीय इमारत व अग्निशामक केंद्रास ताब्यात मिळाली आहे. आज या जागेवर, अग्निशामक केंद्र उभारणीचे काम पुर्ण झाले असून, 50 हजार चौरस फुटाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीचे काम अंतीम टप्यात असून सन 2025 मध्ये त्याठिकाणी नगरपरिषदेचे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे.
आज पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीमध्ये 1 हजार कुटुंबाना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मलकापूर नगरपरिषदेने Best Urban Local Body या आस्थापनेंतर्गत सादर केलेल्या स्पर्धात्मक शहरामध्ये देशातील बहुतांश मोठ्या शहरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्या सर्वामधून देशात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मलकापूर नगरपरिषदेस जाहिर करण्यात आला आहे. यामुळे मलकापूर शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.
 लोकसंख्या वाढीचा विचार करुन 2054 ची लोकसंख्या 106000 गृहित धरुन केंद्रशासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत 24×7 पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केल्याप्रमाणे त्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व तत्कालीन पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, उदयसिंह पाटील, यांच्या विशेष सहकार्यातून नोव्हेंबर 2023 मध्ये 18.61 कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून निविदा प्रक्रिया पुर्ण करुन काम सुरु करण्यात आले आहे.
2025 मध्ये नागरिकांना मागणीप्रमाणे नळ जोडणी मिळणार असून पुर्वीप्रमाणेच पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार आहे. 24 तास घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. सदरचा गॅस स्फोटक विरहित असून गॅस स्फोटामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येणार आहेत. पृथ्वीराज बाबांनी व कै. भास्कररावजी शिंदे यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व जबाबदारी त्यांनी मनोहर भाऊंवर टाकली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भाऊंना त्यांच्या आशिर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहिल.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या