0.6 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो

रामकृष्ण वेताळ; सैदापूर येथे पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

समाजातील प्रत्येक घटकांशी पत्रकारांची नाळ जोडलेली असते. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी आपल्यासाठी लेखणीच्या माध्यमातून ते शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी धारेवर धरत असतात. त्यामुळे पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजाच्या कल्याणासाठी त्यांची लेखणी अखंडपणे तळपत राहो, असे मत भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.

सैदापूर (ता. कराड) येथील त्यांच्या कार्यालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद तोडकर होते. यावेळी कराडसह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री वेताळ म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. परंतु, सध्या पत्रकारिता क्षेत्रातही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव निर्माण झाला असून त्यांनी आपल्या आरोग्याची काळजीही घेणे तितकेच गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने एक लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यरत आहोत. यामध्ये पत्रकार बांधवांची आपल्याला नेहमीच साथ मिळत राहिली आहे. त्यामुळे पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास, अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या हाकेला आपण तात्काळ धावून जाऊ, अशी ग्वाही रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी दिली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रमोद तोडकर म्हणाले, पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. करोनानंतर मुद्रित माध्यमांसमोर सोशल माध्यमांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचीही भर पडली असून त्याला तोंड देणे हेही पत्रकारांसाठी मोठे कसब ठरणार आहे. त्यामुळे पत्रकारांनीही अशा नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला अपडेट करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रारंभी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रस्ताविक राहुल वेताळ यांनी केले. उपस्थित सर्व पत्रकारांचे राहुल डुबल यांनी आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या