-1.5 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांचा वाढदिवस आज शुक्रवार (दि. 10) जानेवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

सकाळी वडील श्रीमंतराव आणि मातोश्री इंदुमती यांचे दर्शन घेतल्यानंतर ते सुर्ली (ता. कराड) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाणार आहे. यानंतर सुर्ली (ता. कराड) येथे वृक्षारोपण करून ते पूर्णवेळ शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

आनंदराज फार्म, खंबाळेपाटी सुर्ली (ता. कराड) येथे शुभेच्छांचा स्वीकारणार आहेत. दुपारी 11 नंतर सर्वांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन सुर्ली येथे केले आहे. अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल 10 जानेवारी रोजी श्री वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली आहे. वाढदिवसासाठी शुभेच्छा देताना हार, फुले, गुच्छ न आणता शैक्षणिक साहित्य घेऊन यावे, असे आवाहन रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या