spot_img
spot_img
spot_img
spot_img

टाळगावच्या धोकादायक सोसायटीची इमारत दुरुस्त करा, अन्यथा न्यायालयात जाऊ 

सभासदांचा अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांना थेट इशारा 

कराड/प्रतिनिधी : –

टाळगाव, ता. कराड येथील विविध सहकारी सोसायटी इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक झाली आहे. त्यामुळे इमारतीची तात्काळ दुरुस्ती करावी अथवा नवीन इमारत बांधकामाबाबत १० दिवसांच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही सुरू करावी, अन्यथा संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करून न्यायालयीन कारवाई करू, असा इशारा टाळगाव सोसोयटीतील सभासदांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, टाळगाव सोसायटीच्या इमारतीच्या पुढील भागात फरशी उखडून पोकळी निर्माण झाली असून मागील भागात उंदरांनी मोठ्या प्रमाणात बिळे पाडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इमारत कोणत्याही क्षणी धोकादायक ठरू शकते.

याबाबत इमारतीच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी इमारतीत शिरल्याने साठवलेल्या धान्याचेही नुकसान झाले होते. धान्य वापरण्यास अयोग्य झाले होते.

या परिस्थितीमुळे सभासद व कर्मचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून साप, विंचू किंवा इतर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इमारतीची तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत १० दिवसांच्या आत निर्णय घ्यावं. आणि त्या संदर्भात कार्यवाही सुरू करावी, अन्यथा संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करून न्यायालयीन कारवाई करण्यात येईल,असा इशारा सभासदांनी निवेदनवजा नोटिसीद्वारे संचालक मंडळास दिला आहे.

सोसायटीच्या इमारतीच्या बांधकामाचे आठ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व आवश्यक परवानग्या व मंजुरी संबंधित प्राधिकरणांकडून मिळाल्या आहेत.

– मोतीराम पाटील (अध्यक्ष, टाळगाव विविध सहकारी सोसायटी)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या