7.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या

मराठ समाजबांधवांची कराडात निदर्शनेःशिवतिर्थ येथे रस्ता रोखला

कराड/प्रतिनिधीः-
मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसीमधुन आरक्षण द्यावे व मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी करीत कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने दत्त चौकात निदर्शने करण्यात आली. यानंतर प्रांत किंवा तहसिलदारांनी दत्त चोकात येऊन निवेदन स्विकारण्याची मागणी करीत संतप्त मराठयांनी दत्त चौकात शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता अर्धा तास रोखला. तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दत्त चौकात येऊन निवेदन स्विकारल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दत्त चौकातील रास्तारोकोमुळे भेदा चौक व कोल्हापूर नाका रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालवत असतानाही सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करून निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसिलदार किंवा प्रांत अधिकार्‍यांनी दत्त चौकात येऊन निवेदन स्विकारण्याची मागणी करण्यात आली. तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागल्याने वरीष्ठ पोलिस निरीक्षक के.एन.पाटील आंदोलनस्थळी आले व त्यांनी आंदोलकांना तहसिलद कार्यालयात जाऊन निवेदन देण्यास सांगीतले. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले.
तहसिलदार व प्रांतांना संपर्क साधुनही निवेदन स्विकारण्यासाठी कोणी आले नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी कोल्हापूर नाक्यावरून शहरात येणार्‍या रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोको केला. प्रारंभी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तरीही आक्रमक झालल्या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत वाहतूक रोखली. शहरातील सर्वाधिक वर्दंळ असलेल्या रस्त्यावरील वाहतूक तब्बल अर्धातास रोखल्याने भेदा चौक व कोल्हापूर नाका रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दत्त चौकात वाहतूक रोखल्याने वाहनचालकांनी पंचायत समिती समोरून उलटया दिशेने दत्त चौकाकडे येण्याचा प्रयत्न केल्याने कोल्हापूर नाका ते भेदा चौक रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
निवेदन स्विकारण्यासाठी नायब तहसिलदार दत्त चौकात आले मात्र केवळ तहसिलदार किंवा प्रांतांनाच निवेदन देण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. भर पावसात आंदोलन सुरू होते. तर वाहनांच्या रांगात आडकलेले दुचाकीस्वात पावसात भिजून चिंब झाले होते. परिस्थीतीचे गांभिर्य ओळखून आखेर तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दत्त चौकात येऊन निवेदन स्विकारले यानंतर सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या