-2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

 अमेरिकेचे धडक निर्णय

अग्रलेख / २३ जानेवारी २०२५  

 अमेरिकेचे धडक निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसदेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी देश-विदेशात अमेरिकन धोरणांमध्ये अनेक मोठे बदल घडवून आणण्याची चर्चा केली आहे. शपथविधीनंतर अर्ध्या तासाच्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट पॉलिसी अंतर्गत इतर देशांवर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी अमेरिकेत फक्त स्त्री-पुरुष लिंग ओळखण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी अवैध स्थलांतिरांना बाहेर काढण्याचे जनतेला आश्वान दिले आहे. ट्रम्प यांनी १० निर्णय जाहीर केले आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या जाहीर केलेल्या १० निर्णयांनी अमेरिकाच नव्हे, अवघ्या जगाला धडकी भरली आहे. ट्रम्प यांनी सत्तेवर येताच अमेरिकेच्या दृष्टीने राष्ट्रवादाचा निर्णय घेण्याचे तंत्र अवलंबला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आजपासून अमेरिकन सरकारसाठी पुरुष आणि महिला असे दोनच लिंग असतील. सर्व सरकारी सेन्सॉरशिप तत्काळ संपुष्टात आणण्यासाठी आणि अमेरिकेतील भाषण स्वातंत्र्य पुनर्संचयित करण्यासाठी मी कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी करेन. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ट्रान्सजेंडर समुदायाविरोधात वक्तव्य केले होते. ट्रम्प यांचे संरक्षण मंत्री पिट हेगसेथ म्हणाले होते की, सैन्यात महिला आणि ट्रान्सजेंडरचा समावेश केल्याने अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ट्रान्सजेंडर समुदाय दुखावण्याची शक्यता जास्त आहे. तसेच देशात बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घालणे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून त्यांना सीमेवर सोडण्याचे धोरण संपुष्टात आणण्याबाबत ट्रम्प यांनी वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी गत सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, बिडेन प्रशासनाने बेकायदेशीरपणे आपल्या देशात घुसलेल्या धोकादायक गुन्हेगारांना आश्रय दिला आणि संरक्षण दिले. प्यू रिसर्च सेंटरच्या दाव्यानुसार, अमेरिकेत जगातील सर्वाधिक स्थलांतरित आहेत. जगातील एकूण २० टक्के स्थलांतरित फक्त अमेरिकेत राहतात. २०२३ पर्यंत येथे राहणाऱ्या एकूण स्थलांतरितांची संख्या ४.७८ कोटी होती.

ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर (दक्षिणी सीमा) आणीबाणी लागू करण्याबाबत इशारा दिला आहे. येथून सर्व बेकायदेशीर प्रवेशांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यूएस-मेक्सिको सीमेवरून येणाऱ्या अवैध स्थलांतरितांची वाढती संख्या हा अमेरिकेच्या राजकारणातील मोठा मुद्दा आहे. ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्याबाबत वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी पनामा कालवा परत घेणार असल्याची धमकी दिली आहे. आज चीन पनामा कालवा चालवत आहे, मात्र तो कालवा आम्ही पनामा देशाला दिला आहे. त्यामुळे पनामा कालवा आम्ही परत घेणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने १९९९ मध्ये हा कालवा अमेरिकेने पनामा देशाला भेट म्हणून दिला होता, परंतु तो आता चीनच्या ताब्यात आहे आणि अमेरिकन जहाजांना येथे जास्त कर भरावा लागतो.

ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका ठेवण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आपल्या देशातील सरकार इतर देशांना श्रीमंत करण्यासाठी आपल्या देशातील जनतेवर कर लावत असे. परंतु आमच्या देशातील लोकांना श्रीमंत करण्यासाठी इतर देशांवर शुल्क आणि कर लादणार आहोत. ट्रम्प यांनी अनेकवेळा म्हटले आहे की, अमेरिकेला इतर देशांसोबत दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्यापार तूट सहन करावी लागते. त्यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर भारी शुल्क लादण्याची धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांचे सरकार ग्रीन न्यू डील समाप्त करेल. ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहनांची गरज संपुष्टात आणण्याबाबत बोलले. ट्रम्प यांनी हवामान बदलावर वारंवार शंका व्यक्त केली आहे. ते जीवाश्म इंधनाचे समर्थक आहेत. २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी २०१५ च्या पॅरिस क्लायमेट डीलमधून अमेरिकेला बाहेर काढले. परंतु अमेरिकेवर आरोप आहे की, पर्यावरण वाचविण्यासाठी ट्रम्प यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत.

ट्रम्प यांनी म्हटले की, ही आरोग्य यंत्रणा आहे जी आपत्कालीन परिस्थितीत काम करत नाही. जगातील इतर कोठूनही यावर जास्त पैसा खर्च केला जातो. आपल्या देशात अशी शिक्षण व्यवस्था आहे जी आपल्या मुलांना स्वतःची लाज बाळगायला शिकवते. पण हे सगळे बदलणार आहे. ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ओबामाकेअर आरोग्य विमा पॉलिसीविरुद्ध आदेश पारित केला. मंगळावरही अमेरिका आपला ध्वज लावणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना लक्ष्य करण्यासाठी १७९८ च्या एलियन एनिमीज ॲक्टचा वापर करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी, जर्मन आणि इटालियन वंशाच्या गैर-अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी केला गेला होता. गुन्हेगारी टोळ्यांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात येईल, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, या कायद्यामुळे त्यांच्या सरकारला अनेक अधिकार मिळतील, ज्याच्या मदतीने सर्व संशयित ड्रग टोळ्यांना अमेरिकेतून बाहेर फेकले जाऊ शकते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या