कराड/प्रतिनिधी : –
येथील नूतन मराठी शाळेत रविवार (दि. 26) रोजी 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले.
हा समारंभ पूर्व प्राथमिक नूतन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला कांबळे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अमृता कुलकर्णी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रविंद्र पवार, सदस्य प्रकाश साठे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.