spot_img
spot_img
spot_img
spot_img

नितीन गडकरी पुरस्कार स्विकारण्यासाठी किसनवीर कारखान्यावर न आल्याने चर्चेंना ऊधान

वाई/दौलतराव पिसाळः-
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सकाळ पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री शपथ विधी सोहळ्याच्या कार्यक्रमा साठी तेथे उपस्थित होते. तेथुन ते हेलिकॉप्टरने पुण्यात 3 वाजण्याच्या सुमारास पोहोचले पण त्याच दरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अशा खराब वातावरणात हॅलिकॉप्टरने प्रवास करणे योग्य नाही असा सल्ला गडकरी यांना
शासकीय यंत्रणेने दिला असल्याने ते किसनवीर कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमा साठी येणार नसल्याचे जड अंतःकरणाने उपस्थित कार्यकर्त्यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपस्थित कार्यकर्त्यांची क्षमा मागत दिलगीरी व्यक्त करत घोषणा केली.
या वेळी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
आज शनिवार दि .9 रोजी किसनवीर कारखान्या कडुन दर वर्षी दिला जाणारा कारखाना संस्थापक असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी कै . किसनवीर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा देशाचे लोकप्रिय आणी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना किसनवीर कारखान्याचे चेअरमन व राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील खासदार नितीन काका पाटील व त्यांच्या सहकारी संचालक मंडळाने जाहीर केले होते
तो पुरस्कार कारखाना स्थळावर येवुन मि स्वताह स्विकारणार असल्याचे नामदार नितीनजी गडकरी यांनी मंत्री मकरंद पाटील आणि खा. नितीन पाटील या दोघांनाही शब्द दिला होता.त्या पध्दतीने लाखो रुपये खर्च करून भव्य मंडप उभारण्यात आला होता त्यात अंदाजे सातारा जिल्ह्यातुन आलेले 10 ते 12 हजारांच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुन्हा नव्याने नितीन गडकरी यांची वेळ घेवुन पुन्हा याही पेक्षा देखण्या कार्यक्रमाचे आयोजन करुया असा निर्धार मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे. पण या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांन मध्ये नाराजीचा सुर दिसून येत होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या