घरं गेली वाहून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
Nagaland-
नागालँडमधील मोन जिल्ह्यातील डिफेन्स कॉलनीमध्ये भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक घरं वाहून गेली आहेत.
नागालँडमधील मोन जिल्ह्यातील डिफेन्स कॉलनीमध्ये भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक घरं वाहून गेली आहेत. या भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच SDRF, आसाम रायफल्स आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे, मात्र नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NDRF आणि सैन्याची अनेक पथकंही मोन जिल्ह्याकडे रवाना झाली आहेत.
मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचं आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हवामानाची चिंताजनक स्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना धोकादायक ठिकाणांवरून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनाची ही घटना अत्यंत मोठी आहे आणि बाधित भागात पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे, ज्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. या दुर्घटनेत झालेल्या एकूण जीवितहानीची आणि नुकसानीची अचूक माहिती अद्यार समोर आलेली नाही.





