spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोयनेचे दरवाजे चार फूटावर

पाटण/प्रतिनिधी:-

गुरवारी मध्यरात्री पासून छत्रपती शिवाजी महाराज जलसागर कोयना धरण पाणलोटक्षेत्रासह नवजा, कोयना, पाथरपुंज संपूर्ण पाटण तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाने कोयना नदीसह तालुक्यातील सर्व ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्‍या पाण्याची आवक प्रतिसेंकद 60 हजार क्युसेक्सने झाली असताना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे वक्र दरवाजे तीन फूटावरुण चार फूटावर उचलून 23,520 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या पावसाने पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रशासन यंत्रणेने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जलसागर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी शुक्रवारी रात्री 10:00 वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 3 फुटावरून 4 फुटापर्यंत उघडून नदीपात्रात 23,520 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरण पायथा विद्युतगृह वीज निर्मितीचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर कोयना नदीमध्ये प्रतिसेंकद एकूण 23,520 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व पाण्याची येणार्या आवक नुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी असे कोयना सिंचन विभागाकडून सुचित करण्यात आले आहे.
गुरवारी मध्यरात्री पासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे पाटण तालुक्यातील कोयना नदीसह मोरणा, वांग, मांड, तारळी, केरा, उत्तर मांड, काजळी, काफना या नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. या नद्यांवरील सर्वच धरणे देखील भरली असून सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रात गुरवारी सायंकाळी पाच ते शुक्रवारी सायंकाळी पाच या 24 तासात कोयना येथे – 207 मिमी एकूण- 2981 मिमी, नवजा येथे – 285 मिमी एकुण- 3620 मिमी, महाबळेश्वर येथे – 341 मिमी एकूण- 3826 पावसाची नोंद झाली आहे. पाणी साठा 88 टिएमसी झाला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या