2.2 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

लाल परीचा प्रवास महागला

अग्रलेख/ २८ /०१ /२०२५ 

लाल परीचा प्रवास महागला

इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. परिवहन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्चर्य व्यक्त करीत म्हटले आहे की, प्रस्तावित भाडेवाढीची मला कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळे परिवहन मंत्र्यांना न विचारताच भाडेवाढ झाली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरून परिवहन खात्याला वाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. बसदर वाढीमुळे प्रवाश्यांचे कंबरडे मोडणार आहे. परिवहन मंत्र्यांनी ही बस दरवाढ मागे घेतली पाहिजे असे वाटते. गेल्या पाच वर्षांत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. ग्राहकांना ही भाडेवाढ परवडणारी नाही.

एसटी भाडेवाढीवरुन सध्या राजकारण तापले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामागे इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ अशी कारणे सरकारकडून दिली जात आहेत. राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. या दरवाढीची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की, महामंडळातील दोन हजार कोटी रुपयांचा होणारा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. एस. टी. बस दरवाढीप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन करणार आहेत. याशिवाय राज्यात इतर ठिकाणीही हे आंदोलन केले जाईल. सत्ताधारी मंत्र्यांनी या दरवाढीचे समर्थन केले आहे. चांगल्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे. महामंडळ कसे चांगले चालेल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी भाडेवाढीचे सर्मथन केले आहे. मंत्री गुलाबाराव पाटील यांनी म्हटले आहे की, एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाडीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागेल.

एसटी महामंडळाने गत तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, आता एसटीचा प्रवास महागला आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. यानंतर अखेर आता एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. याबरोबरच रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे. १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी म्हटले आहे की, १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे अशी माहिती मला सांगण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भातील फाईल माझ्यापर्यंत आलेली नाही. पण भाडेवाढीबाबतची फाईल माझ्यापर्यंत येईल. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. एसटीच्या तिकीट दरात दरवर्षी वाढ करणे गरजेचे असते. कारण प्रवाशांना सुविधा देत असताना एसटी महामंडळाला खर्चही येतो. यामध्ये डिझेलचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. यातच एसटी महामंडळाला दरदिवशी सुमारे ३ कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही ३ रुपये प्रति किलोमीटर होणार आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीची ही भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू असणार आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात एसटी प्रवास दरवाढ प्रवाश्यांना सोसावी लागणार आहे. एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता खासगी प्रवासी सेवाही महागणार आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली. बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आल्याचे अधिकार्‍यानी म्हटले आहे. एसटी महामंडळाने सुमारे १४.९५टक्के भाडेवाढ करण्याची मागणी केली होती, तर ऑटोरिक्षा आणि टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली होती. टॅक्सी आणि ऑटोसाठी शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली होती, परंतु याबाबत अधिकृत निर्णय झाला नसल्याचे अधिकार्‍यानी म्हटले आहे. एस. टी. बस प्रवास महागला आहे, त्याचसोबत रिक्शा, टॅक्सी प्रवास महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या सर्वत्र जीवनावश्यक गोष्टींची महागाई झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने कसे जगायचे हा प्रश्न निर्माण होत आहे.कारण सर्वसामान्य माणसाची कमाई न वाढता महागाई जास्त वाढली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या