-1.1 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकर्‍याच्या दुधाला किंमत हवी

कृष्णाकाठ/01 feb2025/ अशोक सुतार 

 

शेतकर्‍याच्या दुधाला किंमत हवी

 

शेतकरी शेतीसोबत दुग्ध उत्पादन करतो. शेतीला दूध धंद्याची जोड असली तर शेतकर्‍याचा आर्थिक विकास होईल, अशा वल्गना अनेक राज्यकर्त्यांनी केल्या. परंतु शेतकर्‍याच्या दुधाला दर देणायात राज्य सरकार नेहमीच मागे असते. महाराष्ट्रात दुग्ध उत्पादन विक्रमी संख्येने होते. परंतु येथील शेतकर्‍याला त्याचा आर्थिक मोबदला मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच मोर्चा काढला होता. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात प्रति लिटर ४ रुपये आणि ३ रुपये अशी दोन वेळा कपात केली आहे. दूध दरात कपात केल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. ही कपात मागे घेण्यात यावी, गायीच्या दुधाला राज्य शासनाने जाहीर केलेले ७ रुपयांचे अनुदान कायमस्वरूपी लागू करावे, प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.

दुग्ध उत्पादक शेतकर्‍याला जनावरे बाळगणे, त्यांना खाऊ- पिऊ घालणे, त्यांचा चारा, औषध इ. अनेक गोष्टींसाठी खर्च येतो. परंतु शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यास दूध डेअर्‍या टाळाटाळ करतात असे दिसते. अनेकवेळा दुधाला योग्य दर न मिळाल्याने शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध फेकून आंदोलने केली आहेत. परंतु सरकार दुग्ध उत्पादकांची बाजू लक्षात घेत नाही, असेच दिसते. कोल्हापूर शहरातील दसरा चौकात गायीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गायीसह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ नाकारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतीराम घोडके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील माणिक साळुंखे यांनी दिला.

काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने महानंद ही सरकारी संस्था पुनरुजिवित करण्याच्या उद्देशाने मदर डेअरी या संस्थेकडे दिली होती. यासाठी सरकार मदर डेअरीला २५३ करोड रुपये देत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी दुग्ध महासंघ म्हणजेच महानंद डेअरी होय. हे शासकीय उपक्रम आता सरकारला ओझे झाले आहेत. शेतकरी ज्या डेअर्‍यांना दूध देतात, तेथील व्यवस्थापन चोख असेल तर शेतकर्‍यांच्या दुधाला किंमत मिळू शकते. परंतु शासकीय दूध डेअर्‍या शेतकर्‍यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत, असे दिसते. तसेच खासगी दूध संघांनी शेतकर्‍यणा दूध दर योग्यरीत्या देणे आवश्यक असते.

गुजरातमधील दुधाचा अमूल ब्रॅंड सर्वत्र प्रसिद्ध आहे. कारण अमूलचे दूध गुणवत्तापूर्ण असून त्याचे मार्केटिंग नेहमी केले जाते. बाजारात दुधाची गुणवत्ता प्रसिद्ध करणे, त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. तरच दुधाला जास्त दर येईल. गुजरातमधील अमूल दूध आज महाराष्ट्रात वितरित केले जाते आणि त्याचा ग्राहकवर्गही मोठा आहे. दुधावर प्रोसेसिंग करणे ही अवघड प्रक्रिया आहे. त्याला खर्च होतो. परंतु दुधाला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे. महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला दर मिळाला नाही तर शेतकरी दुसर्‍या उत्पादनाकडे वळण्याची भीती वाटते. यामुळे दूध संघांचा कारभार आटपू शकेल अशी परिस्थिति आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या मोर्चाकडे सरकार व प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

महानंद हा सरकारी दुग्ध उपक्रम होता. परंतु निष्क्रिय संचालकांच्या कारभारामुळे हा उपक्रम मदर डेअरीच्या ताब्यात गेला. कारण दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांचे हित न पाहता मनमानी निर्णय घेणे, योग्य व्यवस्थापन नसणे आणि शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव न देणे तसेच योग्य मार्केटिंग न करणे अशी अनेक कारणे यामागे आहेत. आज जागतिकीकरणाचे युग असून व्यापारी स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी जी अंगभूत कौशल्ये आवश्यक आहेत, ती आवश्यक आहेत. ती कौशल्ये नसतील तर आपण स्पर्धेतून बाहेर जाऊ शतकतो. त्यामुळे रचनात्मक काम, योग्य व्यवस्थापन करून शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव देणे सरकारी व खासगी दूध संघांना जमले पाहिजे असे वाटते.

दुग्ध उत्पादक शेतकरी ग्राहकांना दूध पुरवण्याचे काम करतो. परंतु खासगी दूध संघ दुधाचे मार्केटिंग करत नाहीत. योग्य व्यवस्थापन केले तर त्या दुधाचा ब्रॅंड निर्माण करण्यात कोणतीच अडचण नसावी. दुधाचे मार्केटिंग करून त्या दुधाचा सर्वत्र प्रसार केला तर दुधाचा खपही वाढणार आहे. दुधाचा खप वाढला तर दुध्यापासून ज्या उप वस्तु तयार केल्या जातात, त्याचाही खप वाढेल. परिणामी, दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य दर देता येईल. परंतु दूध व्यवसायातील संकुचित मानसिकताच दुग्ध व्यवसायाला अडचण ठरत आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या दुधाला सन्मान मिळवून देण्यासाठी कल्पकता, मार्केटिंग, दुधाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी उपाय आणि योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या