उच्च न्यायालया ची सूचना
सातारा दि २२ ( प्रतिनिधी )
माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप गांभीर्याने घ्या, तुम्ही स्वत लक्ष घाला अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केल्या.
करोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून अनुदान लाटल्याचा आरोप करत मायणी येथील मेडिकल कॉलेजचे संचालक दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने सोमवारी समीर शेख यांना हजर रहाण्यास सुनावले होते. या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु झाली असून यामुळे आमदार गोरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात देखील या प्रश्नावर चर्चा झडली होती.
ReplyForward
|