5.4 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

29 तारखेला या,कोणाला पाडायचे हे ठरवू: जरांगे पाटील

कराड वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

कराड :-

महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी 29 तारखेला अंतरवली -सराटीला या तिथे सर्वांनी एकत्रित येऊन कोणाला पाडायच अन कोणाला जिंकवायचं याचा निर्णय घ्यायचा असल्याचे मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितले आहे. अंतरवली-सराटी येथील बैठेकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मराठा नेते मनोज जारांगे- पाटील यांचे कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा बांधवांनी जेसीबीने फुलांची उधळण करत, एक मराठा…लाख मराठा, जरांगे- पाटील हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी मनोज जरांगे- पाटील म्हणाले, आपल्या मराठा समाजाला गोरगरिबांना विनाकारण नाव ठेवली जात आहेत. आपल्या मराठा समाजाला हिंणवायचं सध्या काम सुरू आहे. कोणी कितीही हिणवलं तरी मी मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहे. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पक्ष सोडून आपल्या लेकरांसाठी एकजुटीने रहा.

मराठा एकत्रित नाही आला की संधीसाधू लोक एकत्र येतात. लोकांना बोलायला जागा ठेवू नका, मराठा एक होत नाही. आपल्याला लढून जिंकायचं आहे. मी बांधावर भाकरी खाणारा मी मराठा आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या