5.4 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोघे ठार

दहिवडी-

आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. अनिकेत नितीन मगर (वय २६ ) व रणजित राजेंद्र मगर (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हा अपघात शेरेवाडी (ता. माण) येथे शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार जयकुमार गोरे यांचा सद्या जनसंवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो. शनिवारी सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती. याच सुमारास बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत मगर व रणजित मगर हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे निघाले होते. आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव कारने दुचाकीला उडवले.

हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले. यात दुचाकीचा चक्काचूर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यात कारचेही मोठे नुकसान झाले. गंभीर दुचाकीस्वारांना तत्काळ दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची दहिवडी पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या