23.8 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

spot_img
spot_img

 पाटण शहरात उत्स्फूर्त बंदसह भर पावसात निषेध मोर्चा

नराधमांना फाशी व राज्यकर्त्यांनी राजीनामा द्यावा – सत्यजितसिंह पाटणकर

   पाटण:-

बदलापूर येथील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाटण येथे व्यापारी, व्यवसायिकांनी दिवसभर उत्स्फूर्त बंद पाळला. तसेच भर पावसात सकाळी महिला, तरुणी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग दाखवत अशा वृतीच्या निषेधार्थ पाटण शहरातून मुक मोर्चा काढला. हा मोर्चा पाटण तहसिल कार्यालय येथे आल्यानंतर अशा घटनेतील नराधमांना फाशी द्या व मुग गिळून गप्प बसणाऱ्या राज्यकर्त्यांनी राजीनामे द्यावेत अशा मागणीचे निवेदन तहसिलदार यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर बोलताना म्हणाले बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारासह राज्यात महिला तरुणी व अल्पवयीन मुलींवर वाढलेले अत्याचार व अन्याय या विरोधात शासनाने तातडीने कठोर भूमिका घेत संबंधितांना फाशी व कठोर कारवाया कराव्यात. राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे हे लोन पाटण तालुक्यातील तारळेपर्यंत पोहोचले आहे. गुन्हेगार प्रवृत्तींच्या कार्यकर्त्यांना प्रशासनावर दबाव टाकून मोकाट सोडले जाते अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करत संबंधित राज्यकर्त्यांनी नैतिकतेची चाड बाळगत राजीनामे द्यावेत
सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर स्थानिक शाळेच्या कर्मचाऱ्याने अतिशय घृणास्पद अत्याचार केला. यासह मागील काही वर्षात राज्यात महिलांवर वाढलेले अत्याचार, अन्याय यासह तरुणी, अल्पवयीन मुलींवर होत असलेले क्रूर अत्याचार या विरोधात समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे याशिवाय संबधितांवर कठोरात कठोर  कडक कारवायाही झाल्या पाहिजेत.  दुर्दैवाने ज्यांच्या हाती राज्याची सत्ता आहे असे राज्यकर्ते या अपप्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचाच आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी पाटण तालुक्यातील तारळे येथेही एका महिलेवर स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी अन्याय, अत्याचार केला. संबंधित महिलेने पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला मात्र तेथेही राजकीय दबाव टाकून कार्यकर्ते गुन्हेगारांना सोयीस्कररित्या यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे देशात, राज्यातच नव्हे तर आता हेच विकृतीचे लोण थेट पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला, तरुणींपर्यंत पोहोचले आहे. राजकीय सत्तेचा वापर आपल्याच माय माऊलींच्या विरोधात करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींविरोधात आता सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन लढण्याचा निश्चय केला आहे. एका बाजूला यातील दोषी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजेच, याशिवाय या दुर्दैवी घटनांना जबाबदार व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या विद्यमान राज्यकर्ते मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी नैतिकतेची चाड बाळगून आपला राजीनामा द्यावा. अशी मागणी सत्यजितसिंह पाटणकर यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी शिवसेना उ.बा. ठा. पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील, मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर,  संजय इंगवले, सौ. विद्या म्हासुर्णेकर, सौ. मीनाज मोकाशी, सौ. सोनल फुटाणे, सौ. गायकवाड, सौ. डावखरे, सौ. हादवे आदी मान्यवर पदाधिकारी, महिला, विद्यार्थिनी आदींनी निषेधात्मक विचार व्यक्त केले.
यावेळी पाटण खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, विलासराव क्षीरसागर, दिपकसिंह पाटणकर, पाटण नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे, उप नगराध्यक्ष सागर पोतदार, नगरसेवक, नगरसेविका विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थिनी हजारोंच्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या