spot_img
spot_img
spot_img
spot_img

युवकांच्या मारहाणीत कासेगावच्या युवकाचा मृत्यू 

वाठार येथील घटना; मारेकरी पसार, पोलिसांकडून शोध सुरू 
कराड/प्रतिनिधी : – 
वाठार (ता. कराड) येथे युवकांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
रहीम सलीम अत्तार रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कासेगाव येथील रहीम अत्तार हा युवक सोमवारी दुपारी वाठार (ता. कराड) येथे आला होता. त्याठिकाणी कासेगावातीललच काही युवकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये रहीम अत्तार गंभीर जखमी झाला. त्यानंतर रहीम याला उपचारासाठी कराडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रात्री त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ वाठारला रवाना झाले. तसेच याप्रकरणी रुग्णालयातही पोलिसांकडून नातेवाईकांकडे चौकशी सुरू होती. रहीम अत्तारला मारहाण करणारे युवक पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सूत्रे हलवली आहेत. या मारहाणीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या