spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला 

 दरवाजे सहा फुटावर: सतर्क राहण्याचे आव्हान

पाटण /प्रतिनिधी:-

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे म्हणून धरण व्यवस्थापनाने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाची सहा वक्र दरवाजे सहा फुटाणे उचलून नदीपात्रात 21 हजार 300 क्यूसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे घेतला आहे

आज दुपारी ४ वाजलेपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंचांवरून ३ फुटापर्यंत उघडून १९,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.*

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण *२१,३०० क्युसेक* विसर्ग सुरू होईल.

तरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या