spot_img
spot_img
spot_img
spot_img

चौघांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

सोलापुरातील मजरेवाडी मध्ये प्रेमसंबंधातून झाला वाद 
मामा  मध्यस्थी करायला आला आणि जीव गमावून बसला 
सोलापूर l महेश गायकवाड –
निशान ने प्रियकर सुफियान याला घरी बोलावून घेतले आणि कडाक्याचे भांडण झाले या भांडणात सुफियान याचे मामा भांडण सोडवण्यास आले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली या बेदम मारहाणी मध्ये त्यांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी सोलापुरात असलेल्या मजरेवाडी भागात घडली आहे.
सोलापुरातील मजरेवाडी  येथे झालेल्या या खून प्रकरणातएकास अटक आली असून तीन जण फरार झाले आहेत.
प्रियकरास घरी बोलावून घेऊन  आपल्या पती मार्फत प्रियकरास मारहाण करत असल्यामुळे
झालेल्या मारहाणीत प्रियकराच्या मामांचा मृत्यू झाला
मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या  ४५ वर्षीय अल्ताफ शेख या व्यक्ती चा ला लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला आहे. नई जिंदगी परिसरातील लोकमान्य नगर येथे रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अल्ताफ बाशा शेख (वय ४५, रा. लोकमान्य नगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेत त्यांचा भाचा सुफियान इर्शाद शेख हादेखील गंभीर जखमी झाला आहे.
“तू का मध्ये पडतोस?” म्हणत केला जीवघेणा हल्ला
लोकमान्य नगर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अल्ताफ शेख हे नातेवाईकांमध्ये चाललेला वाद मिटवण्यासाठी गेले होते. त्यावेळी “तू का मध्यस्थी करतोस?” असा जाब विचारत चार संशयितांनी त्यांच्यावर लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी तुंबळ हल्ला चढवला. या मारहाणीत तोंडावर गंभीर दुखापत होऊन आणि सर्वांगावर मुका मार बसल्याने अल्ताफ शेख जागीच बेशुद्ध पडले. मध्यस्थीदरम्यान त्यांना वाचवण्यासाठी आलेला भाचा सुफियान हा देखील हल्ल्यात गंभीर जखमी झाला.
 अल्ताफ शेख यांना तातडीने खासगी रुग्णालयात आणि तेथून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते परंतु  उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.. हत्येची बातमी पसरताच शासकीय रुग्णालयात नातेवाईक व स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विजापूर नाका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला.
एकाला ठोकल्या बेड्या; विशेष पथके रवाना-
या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्रीच तत्परतेने कारवाई करत मतीन शेख या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
मृत अल्ताफ शेख हे एका खासगी रुग्णालयात नोकरीस होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या