spot_img
spot_img
spot_img
spot_img

दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये तिरंगा मार्चवरून गदारोळ

नवी दिल्ली/वृत्तसंस्थाः-
कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांच्या अटकेनंतर दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात काढण्यात आलेल्या तिरंगा मार्च काढण्यावरून वातावरण चांगलेच तापले. दिल्ली पोलिसांची कठोर कारवाई सुरू असून, आतापर्यंत सुमारे 150 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एसएफआय, डीवायएफआय, एआयएसएफ, एआयवायएफ आणि आइसा यांसारख्या डाव्या विद्यार्थी आणि युवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन जोरदार आंदोलन केले.
तिरंगा मार्च सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी काही प्रमुख नेत्यांना प्रीव्हेंटिव्ह कस्टडीमध्ये घेतले. कॉकरोच जनता पार्टीचा संयोजक अभिजीत दीपके तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्ककडे निघाला होता. मात्र घर सोडणार इतक्यातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गेल्या 6 दिवसांत दीपकेला दुसर्‍यांदा ताब्यात घेण्यात आले आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अनीश गवांडे यांच्या घरी थांबला होता. तिथेच जाऊन पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती.
तर ऑल इंडिया स्टूडेंट्स एसोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना मंडी हाऊस येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर नेहा बोरा यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नेहाल कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी नेले आहे. तसेच तिच्याकडे मोबाईल फोनही नाही असा दावा करण्यात आला.
अभिजीत दीपकेला ताब्यात घेण्यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या पथकाने त्याला नोटीसा बजावल्या होत्या. ज्या भागात ते तिरंगा मार्च काढणार आहेत, त्या भागात ’कलम 163 लागू करण्यात आले असून मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या