कृष्णाकाठ / दि. २४ जानेवारी २०२५/ अशोक सुतार
कुंभमेळ्यातली ‘मोनालिसा’
लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराने रेखाटलेल्या मोनलिसा या व्यक्तिचित्राने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या चित्राने जगातल्या लाखो रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. मोनालिसाचा आदर्श पुढे ठेवून अनेक व्यक्तिचित्रे नंतरच्या काळात रंगविली गेली. आता प्रयागराज कुंभमेळयात अशाच एका मोनालिसाची चर्चा सुरू झाली आहे. या तरुणीला सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. परंतु तिला प्रसिद्धीसोबत चाहत्यांचा त्रासही होऊ लागला आहे. इंटरनेट सेन्सेशन बनल्यामुळे मोनालिसाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे तिला इंदूरला घरी परतावे लागले. मोनालिसाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे, तिच्या जीवाला धोका आहे असे म्हणत संरक्षणाची मागणी केली आहे.
—————————————————————————————
मोनालिसा हे १६ व्या शतकात लिओनार्दो दा विंची ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले एक जगप्रसिद्ध तैलचित्र आहे. पॅरिसमधील लूव्र ह्या संग्रहालयामध्ये हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवले आहे. श्रेष्ठ चित्रकार लिओनार्दो दा व्हींची याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापार्याची पत्नी होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम लिओनार्दोकडे सोपविले होते. या व्यक्तिचित्राने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या चित्राने जगातल्या लाखो रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. मोनालिसाचा आदर्श पुढे ठेवून अनेक व्यक्तिचित्रे नंतरच्या काळात रंगविली गेली. आता प्रयागराज कुंभमेळयात अशाच एका मोनालिसाची चर्चा सुरू झाली आहे. या तरुणीला सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. परंतु तिला प्रसिद्धीसोबत चाहत्यांचा त्रासही होऊ लागला आहे.
मोनालिसा म्हणजेच मोनी भोसले ही कुंभमेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी षोडसवर्षीय मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे सोनेरी डोळे, तिचे सौंदर्य यामुळे कुंभमेळ्यातील इंदूरची मोनालिसा सर्वत्र व्हायरल होत आहे. मोनालिसा ही कुंभमेळयात गळ्यातील माळा, रुद्राक्षमाळा विकणारी मुलगी आहे. मोनालिसा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि तिचा उदरनिर्वाह थांबला. कारण लोक तिला भेटतात आणि सेल्फी काढण्यासाठी तिच्या भोवती गर्दी करतात. तिच्याभोवती यू ट्यूबर्सची जास्त गर्दी आहे. तिचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने तिच्या उदरनिर्वाहाच्या मार्गात अडथळे येत आहेत. ती ज्या तंबूत बसली होती, तिथे लोक सक्तीने आत येऊन तिच्यासोबत फोटो काढत आहेत. विरोध केला तर तिच्या भावालाही मारहाण करण्याची घटना घडली. यामुळे मोनालिसा उदास आहे.
मोनिलासाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात तिचीही चर्चा रंगली. मोनालिसाचे सौंदर्य अप्रतिम आहे. मात्र तिला फोटो काढण्यासाठी, व्हिडीओसाठी, तिच्याशी बोलण्यासाठी तिला लोक त्रास देत आहेत. यामुळे मोनालिसाच्या माळा विक्री व्यवसायवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मोनालिसाने म्हटले आहे की, लोक तिच्यासोबत भेटण्यासाठी, फोटो काढण्यासाठी गर्दी करतात, परंतु तिच्याजवळील माळा लोकांनी विकत घेतल्या तर तिला उदरनिर्वाहासाठी मदत तरी होईल. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे २०२५ चा महाकुंभ मेळा चालू आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वजण मोनालिसाबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे या गर्दीचा तिला त्रास होत आहे. या प्रसिद्धीमुळे तिला महाकुंभ मेळा सोडून घरी जाणे भाग पडले. तसेच तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेसाठी तिला एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला.
कुंभमेळ्यात अथवा घराच्या आसपास मोनालिसा दिसल्यावर अनेकजण तिच्याकडे सेल्फीची मागणी करताना दिसून येत आहे. अनेक युट्यूबर्स, रीलस्टार तिच्याबरोबर व्हिडीओ चित्रीत करण्याची मागणी करताना दिसत आहेत. अनेकजण तिच्या परवानगीशिवाय तिचे व्हिडीओ चित्रित करत आहेत. तिला कुंभ मेळ्यात फिरणे अवघड झाले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून ती कुंभमेळ्यात तोंडाला स्कार्फ बांधून फिरली. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यानिमित्त अध्यात्मिक वातावरण आहे. या कुंभमेळ्यात काही दिवसांपूर्वी आयआयटी साधू आणि सुंदर साध्वी चर्चेत आली होती. त्यासोबतच सावळा रंग आणि सोनेरी डोळे असणारी सुंदर तरुणी सध्या प्रसिद्धीझोतात आहे, तीच मोनालिसा आज सोशल मीडियावरील स्टार बनली आहे. महाकुंभमेळयात मोनालिसा रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या यादीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, इंटरनेट सेन्सेशन बनल्यामुळे मोनालिसाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे तिला इंदूरला घरी परतावे लागले. मोनालिसाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे, तिच्या जीवाला धोका आहे असे म्हणत संरक्षणाची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर एका व्हायरल मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये, मोनालिसाला बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होण्याची इच्छा आहे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मोनालिसा कुंभमेळ्यातील तिच्याभोवतीच्या गर्दीला कंटाळून मोनालिसा तिच्या गावी इंदूर झुसी परिसरात कुटुंबाकडे आली. मोनालिसाचे कुटुंब येथे बांधलेल्या झोपडपट्टीत राहते. वडिलांनी मोनालिसाला घरी परत पाठवले आहे, तर दोन्ही बहिणी अजूनही कुंभमेळ्यात हार विकत आहेत. गरीब परिस्थितीतील मोनालिसाला सौंदर्याचा शाप आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्वत्र मोनालिसाची चर्चा होत असली तरी तिला उदरनिर्वाह होत नसल्याची चिंता आहे.