15 C
New York
Wednesday, May 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘हिंदू एकता आंदोलन’च्या पुरस्कारांची घोषणा

हिंदू धर्मयोद्धा, हिंदू धर्म रणरागिणी, हिंदू धर्म संघटक व हिंदू धर्म प्रचारक पुरस्कारांचे बुधवारी वितरण

कराड/प्रतिनिधी : –

हिंदू एकता आंदोलन, कराड यांच्यातर्फे दरवर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी या उत्सवाचे ५५ वे वर्ष असल्याने यावर्षीपासून हिंदू धर्मयोद्धा, हिंदू धर्म रणरागिणी, हिंदू धर्म संघटक व हिंदू धर्म प्रचारक या विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या सन्मानार्थींची नावे हिंदू एकता आंदोलनचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर यांनी शनिवारी जाहीर केली.

यामध्ये स्पष्टवक्ते, निर्भीड आणि राष्ट्रभक्त पत्रकार, सुदर्शन न्यूजचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी आपल्या लेखणीने भारतीय पत्रकारितेला एक नवा चेहरा दिला आहे. त्यांच्या या कृतिशील कार्याच्या गौरवार्थ हिंदू एकता आंदोलनतर्फे सन २०२५ चा ‘हिंदू धर्मयोद्धा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कुमारी शर्विका जितेन म्हात्रे यांनी वयाच्या तिसऱ्या ते सहाव्या या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर, नाशिक जिल्ह्यातील कठीण असा साल्हेर गिरिदुर्ग, गुजरातमधील गिरनार शिखर, तसेच महाराष्ट्रातील तब्बल १४० गड-किल्ले यशस्वीपणे सर केल्याबद्धल ‘हिंदू धर्म रणरागिणी’ पुरस्कार, तसेच आपले जीवन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी व्यतीत केलेले, गेली अनेक वर्षे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत असताना हिंदू धर्म रक्षा व जागृतीसाठी कार्य करणारे, त्याचबरोबर लव्ह जिहाद, गोरक्षा यासारख्या गंभीर विषयांवरही काम करणारे मुकुंदजी आफळे (सातारा) यांना हिंदू धर्म संघटक आणि गेली अनेक वर्षे ‘शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्तान’च्या माध्यमातून पदभ्रमण गडकोट मोहीम पार करीत हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारे ४) सागर आमले (कराड) यांना ‘हिंदू धर्म प्रचारक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या सन्मानार्थींना मान्यवरांच्या हस्ते बुधवार (दि. ३०) एप्रिल २०२५ कराडच्या ऐतिहासिक दरबार मिरवणूकीच्या सांगता सभेवेळी शहरातील शिवतीर्थ, दत्त चौक येथे पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष श्री. पावसकर यांनी सांगितले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या