झुळूकचा उपक्रम शहरातील शाळांनाही मार्गदर्शक - सुनील पाटील 

झुळूकचा उपक्रम शहरातील शाळांनाही मार्गदर्शक - सुनील पाटील 


कर्मवीर शिक्षण संस्थेच्या  झुळूक - खेळघर शाळेचे उद्घाटन
इस्लामपूर / प्रतिनिधीे
           सुनील पाटील म्हणाले, झुळूकचा उपक्रम हा शहरातील शाळांनाही मार्गदर्शक ठरेल. खेळघर शाळांमधून बालकांच्या मनात शिक्षणाच्या आवडीचे बीज  रोवले पाहिजे, असे प्रतिपादन कामेरी येथील भैरवदेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाटील यांनी केले. त्यांंच्या शुभहस्ते कर्मवीर शिक्षण संस्थेच्या  झुळूक - खेळघर शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आदर्श प्राथमिक विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील हे होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण म्हणून इस्लामपूर येथील मुक्तांगण प्लेग्रुपचे प्रमुख विनोद मोहिते उपस्थित होते.                                                                                   यावेळी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सौ.छाया पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साकेत पाटील,वैभव पाटील, प्रा.संजय पाटील ,अतुल कदम, नारायण पाटील, उपाध्यक्ष विलास बारपटे, विजय पाटील, प्रा.दिलीप पाटील,अशोक नीलकंठ, बी.एन. पाटील,सर्जेराव पाटील, माजी सरपंच अशोक कुंभार, सुभद्रा पाटील ,शैला पाटील, हंबीरराव जेडगे, युवानेते संग्राम पाटील,पोलीस पाटील बाळासो पाटील ,सुदाम राऊत, यावेळी कर्मवीर शिक्षण संस्था संचालक अशोक नीळकंठ यांनी खेळण्यांच्यासाठी पाच हजार रूपयाची देणगी जाहीर केली तर सौ.सारिका पाटील यांनी इयत्ता पहिलीचा संपूर्ण वर्ग डिजिटल करुन देण्याचे  आश्वासन दिले.                                                                                          विनोद मोहिते यांनी बालशिक्षणाचे महत्व सांगितले. मोहिते म्हणाले, बालशिक्षणात बालमानसशास्त्राचा अभ्यास करुन बालकाच्या शिक्षणाच्या गोडीकडे लक्ष दिले पाहिजे.                              कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ.वर्षा चौगले , सुत्रसंचलन- सौ.सारिका पाटील तर झुळूक खेळघराचे व्यस्थापन व साहित्य मांडणी व सजावट सौ.भारती पाटील व तनुजा पाटील यांनी केली होती. आभार सौ.कोमल गायकवाड यांनी मानले.