साहित्य माणसाचं माणूसपण जागं करतं - डॉ. एस. वाय. होनगेकर

साहित्य माणसाचं माणूसपण जागं करतं - डॉ. एस. वाय. होनगेकर
विवेकानंद कॉलेजमध्ये शुक्रवारी वाड्.मय मंडळ उद्घाटन समारंभात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर. व्यासपिठावर उपस्थित डॉ. पी. ए. पाटील, प्रा. बी. के. गोसावी, डॉ. दीपक तुपे.

विवेकानंदमध्ये वाड्.मय मंडळ उद्घाटन समारंभ संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

            साहित्य व्यक्तिगत अनुभवांना सार्वजनिक रूप देत. साहित्यामुळेच मानवी जीवनास आकार प्राप्त होतो, असा आकार माणसातील माणूसपण जागे करतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनाकड कसं पहावं व कसं रहावं याची आनंदी दृष्टी साहित्यातूनच मिळते, असे विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी व्यक्त केले. ते विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी विभागांच्या वतीने आयोजित वाड्.मय मंडळ उद्घाटन समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी हे होते.                                    यावेळी प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर पुढे म्हणाले की, अनुभव विश्व कागदावर आकार घेतं तेव्हा त्याचं रूपांतर साहित्यात होत असतं. साहित्यातील चांगल्या अनुभवातून माणसाचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. साहित्य हे माणसाचं मानसिक आरोग्य चांगल राखण्याचा रामबाण उपाय आहे. कारण वाचनातूनच व्यक्तिच व्यक्तिमत्व घडत असतं. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची आहे. अशी मनाची श्रीमंती साहित्यातून मिळते.                             अध्यक्षीय मनोगतात मराठी विभागाचे प्रमुख प्रा. बी. के. गोसावी म्हणाले की, मानवी मनातील भावनांच व अनुभवाचं प्रकटीकरण साहित्यातून होतं. आपली स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी साहित्य जीवनात उतरविले पाहिजे व त्यातून माणूसपण जपलं पाहिजे. पुस्तकांचे वाचन केले तर ज्ञान मिळेल व साहित्य वाचल तर माणूसपण जाग होईल.                                 कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाड्.मय मंडळ प्रमुख डॉ. पी. ए. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रदीप पाटील यांनी करून दिला. आभार डॉ. दीपक तुपे याने मानले. सूत्रसंचालन कु. सृष्टी चाळके व कु. स्वाती पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रा. एस. एम. रूईकर, डॉ. श्रुती जोशी, प्रा. समीक्षा फराकटे, डॉ. के. डी. तिवडे, डॉ. नीता पाटील, प्रा. विकास मस्के, डॉ. शर्मिला घाटगे, प्रा. सुप्रिया पाटील व विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठ़या संख्येने उपस्थित होते.