जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रमाने स्वामींचा प्रकटदिन सोहळा संपन्न

मंदिर समितीने दिनांक १७ मार्च पासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनाकरीता मंदिर बंद ठेवले असून मंदिरातील नित्य पूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पाश्वभूमीवर आज गुरुवार दिनांक २६ मार्च २०२० स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली.

जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रमाने स्वामींचा प्रकटदिन सोहळा  संपन्न

भाविकांच्या अनुपस्थितीत पार पडली पुजा !

अक्कलकोट / महेश गायकवाड
 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रमाने  संपन्न झाला. 
सध्या कोरोना आजाराच्या संभाव्य संसर्गाची गांभीर्य पूर्वक काळजी म्हणून शासन व जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करीत मंदिर समितीने दिनांक १७ मार्च पासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनाकरीता मंदिर बंद ठेवले असून मंदिरातील नित्य पूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पाश्वभूमीवर आज गुरुवार दिनांक २६ मार्च २०२० स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली.
 यानंतर स्वामी पुण्यतिथी निमित्त आज प्रकटदिनापासून पुण्यतिथीपर्यंत पहाटे ४ वाजता निघणारी प्रभातफेरीही स्थगित करण्यात आली.
              दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभारा मंडपात पुरोहित मंदार पुजारी व मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते गुलाल, पुष्प वाहून पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. 
यानंतर श्रींची नैवेद्य आरती संपन्न झाली. अशा प्रकारे यंदा कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झालेले श्री स्वामी समर्थांचे प्रकट दिन कोणत्याही भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले. या कोरोना संक्रमणाशी लढण्याकरिता प्रत्येकास स्वामी समर्थानी बळ द्यावे व लवकरात लवकर या जागतिक संकटातून सर्वांना स्वामींनी सुखरूपरित्या तारून घ्यावे याकरिता स्वामींच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे मनोगत समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, रामचंद्र समाणे, बाळासाहेब घाटगे, प्रथमेश इंगळे, श्रीपाद सरदेशमुख इत्यादी उपस्थित होते.