नरवीर प्रतापराव गुजर

छत्रपती शिवरायांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांची आज पुण्यतिथी भोसरे ता. खटाव जि. सातारा येथे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा.

नरवीर प्रतापराव गुजर
नरवीर प्रतापराव गुजर यांचा भोसरे येथील अर्धपुतळा

 

 

छत्रपती शिवरायांचे पहिले सरसेनापती-प्रतापराव गुजर

लेख । नितीन वायदंडे

महाराष्ट्र ही संतांची शूर वीरांची भूमी आहे. याच भूमीमध्ये अनेक नररत्न जन्माला आली त्यापैकी सह्याद्रीच्या निसर्गरम्य अशा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव. पवित्र अशा भूमीमध्ये १६१५मध्ये सरसेनापती प्रतापराव गुजरांचा जन्म झाला. प्रतापरावांचे मुळ नाव  कुडतोजी हे होते.
    कुडतोजी हे शिवरायांच्या सैन्यामध्ये साधा सैनिक म्हणून दाखल झाले, त्यांना बलदंड शरीर यष्टी लाभली होती त्याची चुणूक शिवरायांनी पाहिली होती कुडतोजींनी स्वतः गडाचा वेढा  फोडुन महाराजांचा कुटुंब कबिला अझादगडावर पोचला दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणारा कोण आहे ही विचारपूस करून गडावर बोलावून घेतले व अंगावर झालेल्या जखमांना मलम पट्टी केली शिवरायांनी कुडतोजीचा सोन्याचे कडे देऊन गौरव करून शिलेदारी व सरनोबत्ती बहाल केली.
     पुरंदरचा तह झाला होता अशा पेज प्रसंगावेळी कुडतोजींना  शिवरायांच्या मनाची बैचनी पाहावली नाही. कुडतोजी स्वतः गडावरून थेट मिर्झाराजांच्या छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांच्या पदरी नोकरी पत्करली व त्यांच्या छावणीबाहेर पहारा  देऊ लागले, अशा एके दिवशी कडतोजींनी मिर्झाराजे यांच्यावर हल्ला केला  व तो फसला गेला व कुडतोजींना मिर्झाराजांच्या समोर उभे  केले. त्यावेळी कुडतोजी बोलले माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणार यांना आम्ही शांत कसे झोपून देऊ जी समशेर कडतोजींना मारण्यासाठी होती  ती तलवार व घोडा कुडतोजींना बक्षीस म्हणून दिली व कुडतोजींना  छावणीच्या बाहेर सुखरूप सोडण्यात आले.
     मिर्झाराजे म्हणाले ज्यांच्या पदरी तुमच्यासारखे शुरविर  असतील त्यांचा पराजय  कोणी करू शकणार नाही. नौबत झडली  कुडतोजी गडावर आलेले कळताच  महाराज महालात आले व कडतोजींनी लवुन महाराजांना मुजरा केला, महाराजांनी आलिंगन दिले व विचारपूस केली. आपल्या जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी आपला जीव अनेकवेळा धोक्यात घातला होता.
     शिवरायांनी आपल्या विश्वासू शिलेदाराला प्रतापराव ही पदवी बहाल केली. प्रतापरावांनी स्वराज्याच्या खजिन्यात अनेक वेळा भर घातली शिवराय बादशहाच्या भेटीस आगऱ्याला गेले तेव्हा जिजाऊ सोबत राहून स्वराज्याची देखभाल केली. आदिलशहाने शिवरायांना आळा घालण्यासाठी बहलोल खानास पाठवले त्याच्या पाडावासाठी शिवरायांनी सर सेनापतींना सैन्यदल देऊन बहलोलखानाचा पाडाव करण्यासाठी पाठविले. प्रतापराव बहलोल खान यांची उमराणीत  घनघोर लढाई झाली त्यात बहलोल खानाचा पराभव झाला व बहलोलखान शरण आला. गुडघे टेकुन  दयेची भीक मागू लागला. खानाने प्रतापरावांना यापुढे पुन्हा येणार नाही असे वचन दिले प्रतापरावांनी त्याला अभय  दिले त्यामुळे शिवराय संतापले त्याने प्रतापरावांना खरखरीत पत्र लिहून पाठवले पत्र वाचून प्रतापरावांचे मन बैचेन झाले. मनात प्रतिशोध जागा झाला कधी एकदा बहलोल  येतोय कधी त्यांला  संपवतोय असे झाले. बहलोल खानाची छावणी सामान गडाच्या पायथ्याशी कुपे      नेसरिच्या  घनदाट अरण्यात पसरलेली  होती टेहळनी करणारांनी प्रतापरावांना खबर दिली प्रतापरावांचा  रोष उफाळून आला व क्षणात घोड्यावर मांड ठोकली. सोबत सरदार विसोजी  बल्लाळ  विठोजी शिंदे,विठ्ठल अत्रेय, दिपाजी राऊतराव सिद्धि हिलाल कृष्णाजी भास्कर व प्रतापरावांनी छावणीच्या दिशेने झेप घेतली. शिलेदार रावांच्या मागे सुसाट सुटले घोड्यांच्या टापांचा आवाज व टापांचि उडणारी धूळ हर हर महादेव घोष करत  ही घोडी बहलोलच्या छावणीत घुसली  एकच गोंधळ उडाला भयंकर रणकंदन सुरू झाले वारावर वार  झेलत प्रतापराव बहलोल च्या दिशेने सरकत होते त्यांना फक्त बहलोल समोर दिसत होता सरनोबतच्या  अंगावर असंख्य जखमा होत्या बोहलोल  खानाच्या सैन्याने त्यांना चौफेर घेरले सातही जण लढता लढता धारातीर्थी पडले बहलोल  विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता व मनाला विचारत होता कुठून हे बळ आले  मराठ्यांना लढण्यास? महाराष्ट्राची माती सांगत होती हे बलिदान व्यर्थ जाणार नाही बहलोल  खाना......
 सरनोबत  प्रतापरावांच्या जन्मगावास नुकताच ब  दर्जा मिळाला हीच त्यांना मानवंदना.
           नेसरीचे  डोंगर तट व  माती  सांगतात आज ही साक्षी बोलता अर्थ कुडतोजी, डोंगर तटीही तुम्ही राजांना सांगा सरनोबत प्रतापरावांचा अखेरचा मुजरा.
  याच शुरविराच्या शौर्याचा  वसा व वारसा जपण्याचे काम त्यांच्या जन्मभुमित सरसेनापती प्रतापराव गुजर अधिष्ठान व भोसरे ग्रामस्तानच्या वतीने केले जाते.ज्या  तिथीला सरसेनापती प्रतापराव व त्यांच्या बरोबर असणारे सहा ही शिलेदार यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.तो दिवस  म्हणजे  महाशिवरात्री,या दीवशी भोसरे येथे प्रतापरावांचा स्मृतीदिन साजरा केला जातो.
   या स्मृतीदीन सोहळ्यामध्ये सामाजिक, राजकीय  इ.क्षेत्रात नाविन्यपुर्ण  काम करणाऱ्या  व्यक्तीस सरसेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार  प्रदान केला जातो.या वर्षिचा पुरस्कार  जलतज्ञ,कार्यकारी  अध्यक्ष  आदर्शगाव समिती महाराष्ट्र शासन पोपटराव पवार यांना देण्यात येणार आहे .

          
          
      स्मारकाच्या कामासाठी निधी मिळावा

    छत्रपती शिवाजी राजे यांच्या पवित्र पद स्पर्शाने पावन झालेल्या व  सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमी मध्ये.भोसरेकर ग्रामस्थांच्यावतीने  गेली दहा वर्षापासून अतिशय चांगले काम करण्यात येत आहे. प्रताप सृष्टी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचे नियोजित  इमारत बांधण्यात आली होती. परंतु तेथील जमीनीच्या वादामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचलल्यामुळे व मिळणारा निधी वेळेत न दिल्यामुळे आज ते स्मारक भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
     आज सध्या 264. 58 लाख निधी मागणीची फाईल शासनदरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली आहे तरी संबंधित मंत्री व शासन यांनी हा निधी ताबडतोब स्मारकाच्या कामासाठी द्यावा अशी भोसरेकर ग्रामस्थानकडून विनंती करण्यात येत आहे.
      नितीन जाधव
      सरपंच भोसरे